अभिनेता आयुष्यमान खुरानावर स्क्रिप्ट चोरीचा गुन्हा दाखल

बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुरानावर दिग्दर्शक कमलकांत चंद्रा यांनी स्क्रिप्ट चोरीचा आरोप केला आहे. या प्रकरणी चंद्रा यांनी आयुष्मानविरोधात काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला आहे.

Ayushmann Khurrana, अभिनेता आयुष्यमान खुरानावर स्क्रिप्ट चोरीचा गुन्हा दाखल

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुरानावर दिग्दर्शक कमलकांत चंद्रा यांनी स्क्रिप्ट चोरीचा आरोप केला आहे. या प्रकरणी चंद्रा यांनी आयुष्मानविरोधात काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला आहे.

कमलकांत चंद्रा यांनी आपल्या तक्रारीत सांगितले, “मी सप्टेंबर 2017 मध्ये आयुष्मान खुरानाला एका चित्रपटाची कथा दिली होती. खुरानाला ती कथा आवडली होती. त्यानंतर माझी आणि आयुष्मान यावर कुठलीही चर्चा झाली नाही. मात्र, आता आयुष्मान माझ्या कथेवर निर्माते दिनेश विजान आणि दिग्दर्शक अमर कौशिक बाला यांच्यासोबत माझ्या कथेवर चित्रपट तयार करत आहे.”

चंद्रा यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आयुष्मान खुरानासह निर्माते दिनेश विजान आणि दिग्दर्शक अमर कौशिक बाला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास डीवायएसपी शांताराम वळवी करत आहेत.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *