100 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी यशराज फिल्म्सविरोधात गुन्हा

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offences Wing) बॉलिवूडच्या प्रोडक्शन हाऊस यशराज फिल्म्सविरोधात (YRF) 100 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

100 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी यशराज फिल्म्सविरोधात गुन्हा

मुंबई : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offences Wing ) बॉलिवूडमधील प्रोडक्शन हाऊस ‘यशराज फिल्म्स’विरोधात (YRF) 100 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा ‘द इंडियन परफॉर्मिंग राईट्स सोसायटी’ (IPRS)च्या तक्रारीनंतर दाखल करण्यात आला आहे (Fraud Case Filed Against YRF).

IPRS ही संस्था गीतकार, संगीतकार, गायक आणि संगीत निर्मात्यांचं प्रतिनिधित्व करते (Fraud Case Filed Against YRF). IPRS द्वारे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, यशराज फिल्म्सने कलाकारांना काही संशयास्पद करारांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडलं आणि त्यांना रेडियो स्टेशन्स, संगीत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरुन मानधन घेण्यासही मज्जाव केला.

प्राथमिक तपास आणि पुराव्यांच्या आधारे यशराज फिल्म्स आणि त्यांचे सर्वेसर्वा असलेले आदित्य चोप्रा, तसेच उदय चोप्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी तपास सुरु असून गरज पडल्यास आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल, अशी माहिती या प्रकरणाचा तपास अधिकाऱ्याने दिली. त्याशिवाय, जर इतर कुठलंही प्रोडक्शन हाऊस आणि स्टुडिओ अशा प्रकारच्या प्रकरणात गुंतलेलं आढळलं, तर त्यांचीही चौकशी केली जाईल, असंही अधिकारी म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *