KBC 11 : दुसऱ्याच आठवड्यात सीझनमधील पहिला करोडपती मिळाला?

सोनी टीव्हीवर सुरु असलेल्या "कौन बनेगा करोडपती" कार्यक्रमात मध्य प्रदेशमध्ये राहणारी चरणा गुप्ता 1 कोटींच्या प्रश्नापर्यंत पोहचली आहे.

KBC 11 : दुसऱ्याच आठवड्यात सीझनमधील पहिला करोडपती मिळाला?

मुंबई : सोनी टीव्हीवर सुरु असलेल्या “कौन बनेगा करोडपती” कार्यक्रमात मध्य प्रदेशमध्ये राहणारी चरणा गुप्ता 1 कोटींच्या प्रश्नापर्यंत पोहचली आहे. या सीझनमध्ये पहिल्यांदाच एखादा स्पर्धक 1 कोटींच्या प्रश्नापर्यंत पोहचला आहे. आज (26 ऑगस्ट) संध्याकाळी हा कार्यक्रम सोनी टीव्हीवर रात्री 9 वाजता प्रसारित होणार आहे.

मध्य प्रदेशच्या शहडोलमध्ये राहणारी चरणा सध्या कामगार निरीक्षक पदावर रुजू आहे. चरणाने पुण्यातून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. 29 जुलै 2017 रोजी तिची पोस्टिंग शहडोलमध्ये झाली होती. चरणा यांचा पती अमर गुप्ता शहडोलमध्ये असिस्टंट ट्रेजरी ऑफिसर आहे.

“अमिताभ बच्चन यांच्या समोर बसून प्रश्नांची उत्तर देणं मला खूप अभिमानास्पद वाटत आहे. ते स्पर्धकांचं मनोबल वाढवतात. तसेच ते मध्ये-मध्ये असे प्रश्न करतात की ज्यामुळे स्पर्धकच्या डोक्यावरील ताण कमी होतो. मी आता यापुढे काही सांगू शकत नाही. तुम्ही माझा कार्यक्रम पाहा”, असं चरणा म्हणाली.

ज्यावेळी चरणा गुप्ता अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांची उत्तर देत होती. त्यावेळी तीचे पतीही देवाकडे तिच्या यशासाठी हात जोडून प्रार्थना करत होते. चरणाला घरी प्रेमाने कांची बोलतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *