फोर्ब्स 2019 : यंदाही स्कारलेट जोहानसन सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री, दीपिका आणि प्रियांका टॉप 10 मधून बाहेर

Forbes ने 2019 मध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये टॉप 10 अभिनेत्रींची नावं आहेत. या यादीत हॉलिवूड अभिनेत्री स्कारलेट जोहानसन (Scarlett Johansson) ही पहिल्या क्रमांकावर आहे.

फोर्ब्स 2019 : यंदाही स्कारलेट जोहानसन सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री, दीपिका आणि प्रियांका टॉप 10 मधून बाहेर

मुंबई : Forbes ने 2019 मध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये टॉप 10 अभिनेत्रींची नावं आहेत. या यादीत हॉलिवूड अभिनेत्री स्कारलेट जोहानसन (Scarlett Johansson) ही पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र,  बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये गेलेल्या प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या दोघींनाही या यादीत स्थान मिळालं नाही.

Marvels च्या एव्हेंजर्स या सिरीजमध्ये लेडी सुपरहीरो ‘ब्लॅक विडो’ म्हणून प्रसिद्ध असलेली 34 वर्षीय स्कारलेट जोहानसन ही सगल दुसऱ्यांदा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. यंदा तिचं वार्षिक उत्पन्न 56 मिलियन डॉलर (जवळपास 400 कोटी रुपये) इतकं आहे. 2018 मध्ये स्कारलेट ने 15.5 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 110 कोटी रुपयांची कमाई केली होती. तिच्या या यशाचं कारण Marvels च्या एव्हेंजर्स एंडगेम्सचं यश आहे.

फोर्ब्सकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सोफिया वेरगारा (41.1 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 293 कोटी रुपये) आणि रीज विदरस्पून (35 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 250 कोटी रुपये) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत गाजलेल्या प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या दोघीही या यादीत स्थान मिळवण्यात अयशस्वी  ठरल्या. 2018 मध्ये दीपिकाचा पद्मावत हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यानंतर अद्याप तिचा एकही सिनेमा आलेला नाही. दुसरीकडे ‘देसी गर्ल’ प्रियांका ही देखील सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. पण, तिने ‘अ किड लाइक जॅक’ आणि ‘इजंट इट रोमॅटिक’ या दोन हॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं.

गेल्या काही दिवसांपूर्वी फोर्ब्सने सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांची यादी जाहीर केली होती. यामध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा 466 कोटी रुपयांच्या कमाईसोबत चौथ्या क्रमांकावर होता. या यादीत ‘द रॉक’ म्हणजेच ड्वेन जॉनसन टॉपवर होते.

संबंधित बातम्या :

Bigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज

पाकिस्तानात परफॉर्म करणार, बघू कोण थांबवतंय, शिल्पा शिंदेकडून मिका सिंहची पाठराखण

KBC 11 | जेव्हा अमिताभ बच्चन वयाने लहान स्पर्धकाच्या पाया पडतात…

मिका सिंगप्रमाणे सलमानवरही बंदी घालू, सिने असोसिएशनचा इशारा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *