घरी जा आणि दिवाळी साजरी करा, कॅमेरामनवर संजय दत्त भडकला

  • Sachin Patil
  • Published On - 13:05 PM, 9 Nov 2018

मुंबई : बॉलिवूडमध्येही सध्या दिवाळीचं जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे. अभिनेता संजय दत्तच्या घरीही दिवाळी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीसाठी संजय दत्तचे काही नातेवाईक आणि जवळचे मित्र आले होते. पार्टीनंतर संजय दत्त या सर्वांना सोडण्यासाठी बिल्डिंगच्या खाली आला आणि त्याची गाठ कॅमेरामन्सशी पडली.

संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यताने मुलांसह फोटोसाठी पोज दिली. पण संजय दत्तचा मूड अचानक बिघडला आणि त्याने कॅमेरामनला शिवीगाळ केली. तुम्ही घरी जा आणि दिवाळी साजरी करा, असं तो कॅमेरामनला म्हणाला. हे आमचं काम आहे, असं कॅमेरामनने सांगितल्यानंतर संजू बाबा आणखी भडकला आणि त्याने शिवीगाळ केली.

संजू बाबा आणि मीडियाचा हा वाद नवा नाही. या अगोदरही त्याचा पत्रकारांशी वाद समोर आलेला आहे. आनंदाच्या क्षणी पत्रकारांनी काम करु नये असं त्याचं म्हणणं आहे.

काही दिवसांपूर्वीच संजय दत्तचा बायोपिक रिलीज झाला होता. या सिनेमात माध्यमांनी आपली प्रतिमा कशी खराब केली आणि वास्तव दाखवलं नाही या गोष्टीवरच जास्त प्रकाश टाकण्यात आला होता. कदाचित तोच राग संजय दत्त कायमस्वरुपी काढत नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

पाहा व्हिडीओ :