सुरवीन चावलाची चाहत्यांना गोड बातमी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावलाने काही महिन्यांपूर्वी लग्न करुन चाहत्यांना धक्का दिला होता. आताही अशाच प्रकारे सुरवीनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. प्रेग्नंट असल्याची माहिती सुरवीनने दिली. तसेच, मी पहिल्या बाळाच्या जन्माची आतुरतेने वाट बघत असल्याचं ही सुरवीने सांगितलं आहे. गुरुवारी सुरवीने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, …

सुरवीन चावलाची चाहत्यांना गोड बातमी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावलाने काही महिन्यांपूर्वी लग्न करुन चाहत्यांना धक्का दिला होता. आताही अशाच प्रकारे सुरवीनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. प्रेग्नंट असल्याची माहिती सुरवीनने दिली. तसेच, मी पहिल्या बाळाच्या जन्माची आतुरतेने वाट बघत असल्याचं ही सुरवीने सांगितलं आहे.

गुरुवारी सुरवीने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “आयुष्यात घडणाऱ्या घटना आपण टाळू शकत नाही, तशाच काही घटना आयुष्यात आनंद घेऊन येतात. अशीच एक आनंदाची घडना माझ्या आयुष्यात घडत आहेत.”

सुरवीने पुढे पोस्टमध्ये लिहीलयं, “या आनंददायी घटनेमुळे माझ्या आयुष्यात चमत्कार होणार असून माझ्या शरीरात एक आयुष्य वाढत आहे.”

सुरवीनने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा नवराही दिसतो आहे. तसेच, तिथे लहान मुलाचे बुटही ठेवले आहेत.

लग्नानंतर आयुष्य बदलले : सुरवीन

“लग्नानंतर आयुष्यात सकारात्मक बदल झाले आहेत. सुदैवाने मला असा नवरा मिळाल्याने आयुष्य सुकर झालं आहे.”, असे काही दिवसांपूर्वी सुरवीने खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.

हेट स्टोरी 2, अग्ली, पार्च यांमधील सुरवीन चावलाच्या भूमिका विशेष गाजल्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *