‘गुड न्यूज’च्या ट्रेलरवरुन वाद, अक्षयवर भगवान रामांचा अपमान केल्याचा आरोप

या सिनेमाचे दोन ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले आहेत. ट्रेलर अनेकांच्या पसंतीसही पडत आहेत. मात्र, या सिनेमाच्या दुसऱ्या ट्रेलरवरुन सध्या सोशल मीडियावर वादळ उठलं आहे.

'गुड न्यूज'च्या ट्रेलरवरुन वाद, अक्षयवर भगवान रामांचा अपमान केल्याचा आरोप

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच आपला अक्षय कुमार (Akshay Kumar) सिनेसृष्टीतील सर्वात जास्त कमाई करणारा अभिनेता आहे. सध्या अक्षयच्या ‘गुड न्यूज’ (Good Newwz) या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. अक्षयचे चाहते त्याच्या या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाचे दोन ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले आहेत. ट्रेलर अनेकांच्या पसंतीसही पडत आहेत. मात्र, या सिनेमाच्या दुसऱ्या ट्रेलरवरुन सध्या सोशल मीडियावर वादळ उठलं आहे (Good Newwz Second Trailer).

‘गुड न्यूज’च्या ट्रेलरमध्ये भगवान राम यांचा अपमान केल्याचा आरोप ट्विटरवर केला जात आहे (Akshay Kumar disrespect Lord Ram ). या ट्रेलरमध्ये भगवान राम यांच्या नावावरुन आक्षेपार्ह संवाद आहे. यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून अक्षय कुमारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.

हा संवाद विनोदासाठी करण्यात आलेला असला, तरी प्रेक्षकांना तो काही फारसा आवडलेला नाही. प्रेक्षकांनी अक्षय कुमारवर टीकेची झोड उठवली आहे. इतकंच नाही तर अक्षयच्या नागरिकतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर काहींनी अक्षयला भगवान राम यांचा अपमान न करण्याचा सल्ला दिला. भगवान रामसाठी अशा आक्षेपार्ह शब्दांचा वापर चुकीचा असल्याची भावना प्रेक्षक व्यक्त करत आहेत.

दुसरीकडे, अक्षय कुमारवर होत असलेल्या टीका पाहता त्याचे काही चाहते त्याच्या समर्थनार्थ पोस्ट करत आहेत. त्यांच्यामते अभिनेता सलमान खानचे चाहते अक्षय कुमार बाबत अफवा पसरवत आहेत.

‘गुड न्यूज’ मध्ये अक्षय कुमार आणि करीना कपूरसोबतच अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh), आदिल हुसैन (Adil Hussain) आणि अभिनेत्री टिस्का चोप्रा (Tisca Chopra) हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत (Good Newwz Trailer).

‘गुड न्यूज’ सिनेमाचा पहिला ट्रेलर अत्यंत विनोदी आहे. हा ट्रेलर पाहून तुम्ही खदखदून हसल्याशिवाय राहणार नाही. या सिनेमात वरुण (अक्षय कुमार) आणि दीप्ती बत्रा (करीना कपूर खान) या दाम्पत्याला मुलं हवं असतं. यादरम्यान ते मिस्टर अँड मिसेस बत्रा (दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणी) म्हणजेच मोनिका आणि हनी बत्रा यांना भेटतात. या दोन्ही जोडप्यांमध्ये वैर निर्माण होतो. यादरम्यान, अनेक विनोदी प्रसंग घडतात.

हा एक रोमँटिक-कॉमेडी सिनेमा आहे. राज मेहता यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा 27 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. अनेक काळानंतर अक्षय कुमार आणि करीना कपूर खान एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी त्यांनी ‘अजनबी’, ‘ऐतराज’, ‘टशन’, ‘बेवफा’, ‘कम्बख्त इश्क’ आणि ‘गब्बर इज बॅक’यांसारख्या सिनेमांमध्ये सोबत काम केलं आहे.

Published On - 3:14 pm, Mon, 23 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI