Rhea Chakraborty | रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

ड्रग्स प्रकरणी तुरुंगात असलेल्या रिया चक्रवर्ती हिच्यासह 5 जणांच्या जामीन अर्जावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. (Rhea Chakraborty bail hearing at Mumbai High court)

Rhea Chakraborty | रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई: ड्रग्ज प्रकरणी तुरुंगात असलेल्या रिया चक्रवर्ती हिच्या जामीन अर्जावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. रिया सह शौविक चक्रवर्ती, दीपेश सावंत, झैद विलात्रा आणि वासीद परिहार यांच्याही जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. सर्व आरोपींना जामीन मिळावा म्हणून त्यांचे वकील प्रयत्न करत आहेत. तर या आरोपींना जामीन मिळू नये यासाठी एनसीबीच्या वकिलांनी ही तयारी केली आहे. (Rhea Chakraborty bail hearing at Mumbai High court)

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) च्या दोन युनिटने गेल्या आठवड्यात अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत. गुरुवारी आणि शुक्रवारी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी एकूण आठ ठिकाणी छापे टाकले. त्यात विविध प्रकारचे अंमली पदार्थ जप्त केलेत. मुख्य म्हणजे एनसीबीने क्षितिज प्रसाद याला अटक केली आहे. तर त्यानंतर श्रद्धा कपूर , सारा अली खान यांची चौकशी झाली तर एसआयटीने अभिनेत्री दीपिका पदुकोणची चौकशी केली.

धर्मा प्रोडक्शनशी संबंधित क्षितिज प्रसाद याला अटक केल्या नंतर एनसीबी बाबत वाद झाला होता. क्षितिज याचे वकील सतीश मानेशिंदे यांनी क्षितिज याच्या बाबत थर्ड डिग्रीचा वापर करण्यात आल्याचा आरोप केला होता. मात्र , हा आरोप कोर्टाने मान्य केलेला नाही. याबद्दल एनसीबी तर्फे खुलासा करण्यात आला आहे.

NCB महासंचालकांची भेट

मागील दोन- तीन दिवस एनसीबीकडून सतत मोठ्या कारवाया केल्या गेल्या आहेत. त्यात अनेक महत्वाचे पुरावे गोळा करण्यात आले असून आता एनसीबी या पुराव्यांचा अभ्यास करत आहे. एनसीबीचे महासंचालक अलोक अस्थाना यांनी रविवारी मुंबईत धावती भेट दिली. या बैठकी मध्ये त्यांनी एनसीबीच्या तपासाचा आढावा घेतला. “सर्व कारवाई योग्य प्रकारे झाली आहे. कुणावर ही बळजबरीने कारवाई करण्यात आलेली नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं. ज्या व्यक्तींना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यापैकी कोणालाही क्लीन चिट दिलेली नाही. एनसीबीची कारवाई सुरूच राहणार आहे. मात्र,आपल्याकडून चुका होणार नाहीत याची काळजी घ्या,”असा सल्ला त्यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी सोमवारी कोणालाही बोलावले नाही. मात्र, येत्या एक दोन दिवसात एनसीबीचे अधिकारी फिल्म इंडस्ट्रीमधील बड्या व्यक्तींना बोलावण्याची श्यक्यता व्यक्त केली जात आहे. तर, उद्या रिया चक्रवर्तीसह पाच जणांच्या जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.  दरम्यान, यापूर्वी झालेल्या सुनावणीत रिया चक्रवर्तीला 6 ऑक्टोंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

ड्रग्ज देवाणघेवाणीसाठी सुशांतकडून वापर, रियाचा दावा, जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी

Rhea Chakraborty | रियामागची शुक्लकाष्ट संपेना, पावसामुळे जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर

(Rhea Chakraborty bail hearing at Mumbai High court)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *