दादरमध्ये कलाकारांचा बेरंग, मराठी कलाकर आणि पोलिसांची वादावादी

मुंबई: देशभरात होळीचा उत्साह असताना, इकडे मुंबईतील दादरमध्ये मराठी कलाकारांच्या होळीच्या रंगाचा बेरंग झाला. पोलीस आणि मराठी सिनेकलाकारांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. होळी साजरी करत असताना डीजे लावण्यावरुन पोलीस आणि कलाकारांमध्ये वादावादी झाली. सायलेन्स झोन अर्थात शांतता क्षेत्र असल्याचा दावा करत पोलिसांनी डीजे लावण्यास विरोध केला. मात्र जिथे डीजे लावला जात होता, तो सायलेन्स झोन …

दादरमध्ये कलाकारांचा बेरंग, मराठी कलाकर आणि पोलिसांची वादावादी

मुंबई: देशभरात होळीचा उत्साह असताना, इकडे मुंबईतील दादरमध्ये मराठी कलाकारांच्या होळीच्या रंगाचा बेरंग झाला. पोलीस आणि मराठी सिनेकलाकारांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. होळी साजरी करत असताना डीजे लावण्यावरुन पोलीस आणि कलाकारांमध्ये वादावादी झाली.

सायलेन्स झोन अर्थात शांतता क्षेत्र असल्याचा दावा करत पोलिसांनी डीजे लावण्यास विरोध केला. मात्र जिथे डीजे लावला जात होता, तो सायलेन्स झोन नसल्याचा दावा कलाकारांचा आहे. सायलेन्स झोन नसतानाही कलाकारांच्या कार्यक्रमाला पोलिसांचा विरोध का? असा सवाल यावेळी कलाकारांनी उपस्थित केला.

पोलिसांच्या कार्यक्रमाला मराठी सिनेकलाकार लागतात, मात्र कलाकारांच्या कार्यक्रमाला पोलिसांचा विरोध का? असा संतप्त सवाल अभिनेता सुशांत शेलारने विचारला.

आम्ही रितसर पोलिसांची परवानगी घेतली आहे. आम्ही नेहमीच पोलिसांच्या सोबत असतो. पोलिसांच्या कार्यक्रमाला आम्ही हजर असतो, त्यामध्ये सहभागी होत असतो. आम्ही आजच्या कार्यक्रमाची पूर्ण तयारी केली आहे. सर्व कलाकार इथे येत आहेत, त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून डीजे लावण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती सुशात शेलारने केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *