हॉलिवूड स्टार नेटफ्लिक्सच्या शुटिंगसाठी भारतात, पण ट्राफिकमध्ये घामाघूम

मुंबई : हॉलिवूड स्टार आणि सुपरहिरो थॉर(Thor) सिनेमात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता क्रिस हेम्सवर्थ अहमदाबादमध्ये शूटिंगसाठी आला आहे. हॉलिवूड सिनेमात असंख्य खलनायकांना घाम फोडणारा अभिनेता क्रिस स्वत: अहमदाबादमध्ये ट्राफिकमध्ये घामाघूम झाला. त्याने या बाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. याबाबतची माहिती क्रिसने रविवारी (18 नोव्हेंबर) इंस्टाग्राम स्टोरी द्वारे दिली. शेअर केलेल्या या स्टोरीसोबत क्रिसने यावेळी …

हॉलिवूड स्टार नेटफ्लिक्सच्या शुटिंगसाठी भारतात, पण ट्राफिकमध्ये घामाघूम

मुंबई : हॉलिवूड स्टार आणि सुपरहिरो थॉर(Thor) सिनेमात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता क्रिस हेम्सवर्थ अहमदाबादमध्ये शूटिंगसाठी आला आहे. हॉलिवूड सिनेमात असंख्य खलनायकांना घाम फोडणारा अभिनेता क्रिस स्वत: अहमदाबादमध्ये ट्राफिकमध्ये घामाघूम झाला. त्याने या बाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

याबाबतची माहिती क्रिसने रविवारी (18 नोव्हेंबर) इंस्टाग्राम स्टोरी द्वारे दिली. शेअर केलेल्या या स्टोरीसोबत क्रिसने यावेळी आपलं मत व्यक्त केलं. “भारतातील ट्राफिक जॅमचा अनुभव घेतल्यानंतर इथल्या ‘सुंदर अव्यवस्थे’ला मानावं लागेल,” अशी इंस्टाग्राम पोस्ट क्रिसने केली आहे.

‘नेटफ्लिक्स’ या वेबसीरिजच्या शुटिंगसाठी क्रिस भारतात आला आहे. नेटफ्लिक्सच्या ‘ढाका’ या वेब सीरिजमध्ये तो झळकणार आहे. याच दरम्यान, क्रिस हा अहमदाबादमध्ये आला आहे. मात्र यावेळी त्याला अहमदाबादच्या ट्राफिकचा सामना करावा लागला.

क्रिस हेम्सवर्थ हॉलिवूडमधील एक प्रसिद्घ अभिनेता आहे. त्याने आजवर हॉलिवूडच्या थॉर, थॉर- रंगरोक, अवेंजर्स : इंफिनीटी वॉर आणि 12 स्ट्राँग अशा विविध सिनेमात अभिनय केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *