‘गली बॉय’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन दिवसात किती कमाई?

मुंबई : अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा गली बॉय चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जोया अख्तर हिने या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. देशात एकूण 3350 स्क्रीनवर गली बॉय चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसात 32 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने गुरुवारी 19 कोटी …

‘गली बॉय’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन दिवसात किती कमाई?

मुंबई : अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा गली बॉय चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जोया अख्तर हिने या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. देशात एकूण 3350 स्क्रीनवर गली बॉय चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.

चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसात 32 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने गुरुवारी 19 कोटी 40 लाख रुपयांचा गल्ला जमवला आणि शुक्रवारी 13 कोटी 10 लाख रुपयांची कमाई केली होती. शनिवारी या चित्रपटाने 17 कोटी 50 लाखांची कमाई केली आहे. या चित्रपटाने मेट्रो सिटीसारख्या शहरात जास्त कमाई केली आहे.

गली बॉयची कमाई

  • गुरुवार – 19 कोटी 40 लाख
  • शुक्रवार – 13 कोटी 10 लाख
  • शनिवार – 17 कोटी 50

ग्रॅमी अवॉर्ड विनर रॅप आर्टिस्ट विल स्मिथने चित्रपट पाहिला आणि यामधील रणवीर सिंहच्या अभिनयाचे त्याने कौतुक केले. या चित्रपटात रणवीर एका रॅपरच्या भूमिकेत आहे. विल स्मिथने रणवीरला शुभेच्छा देत म्हटलं की, “यो रणवीर, कॉन्ग्रॅट्स मॅन. गली बॉयमधील तुझे काम मला आवडले”.

अभिनेता रणवीर सिंहचा चित्रपट पद्मावत आणि सिंबाने बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई केली आहे आणि आता गली बॉयही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. ट्रेड विशेष तज्ञांच्या मते, हा चित्रपट 100 कोटींचा आकडा गाठू शकते.

व्हिडीओ : लोकलमधून उतरताना तरुणाचा तोल गेला, आरपीएफ जवानाने वाचवले प्राण

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *