'ठाकरे'सोबत प्रदर्शित झालेल्या 'मणिकर्णिका'ची कमाई किती?

मुंबई : कंगना राणावतचा नवीन चित्रपट ‘मणिकर्णिका’ ‘द क्वीन ऑफ झाशी’ने चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 18 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई या चित्रपटाने केली आहे. चित्रपटात कंगनाने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारली आहे. चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी ट्वीट करत चित्रपटाच्या कमाईबद्दल माहिती दिली आहे. …

'ठाकरे'सोबत प्रदर्शित झालेल्या 'मणिकर्णिका'ची कमाई किती?

मुंबई : कंगना राणावतचा नवीन चित्रपट ‘मणिकर्णिका’ ‘द क्वीन ऑफ झाशी’ने चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 18 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई या चित्रपटाने केली आहे. चित्रपटात कंगनाने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारली आहे.

चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी ट्वीट करत चित्रपटाच्या कमाईबद्दल माहिती दिली आहे. मणिकर्णिका ने पहिल्या दिवशी तामिळ, तेलुगू आणि हिंदी भाषामध्ये एकूण 8.75 कोटी रुपये कमावले आहे. मात्र दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत भरघोस वाढ झालेली दिसत आहे. पहिल्या दिवशीच्या कमाईपेक्षा दोन पटीने जास्त पैसे दुसऱ्या दिवशी कमावले आहेत.

दुसऱ्या दिवशी शनिवारी चित्रपटाने 18.10 कोटी रुपये कमावले आहेत. यासोबत दोन दिवसांमध्ये मणिकर्णिकाची कमाई 26.85 कोटी रुपयापर्यंत पोहोचली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा फायदा चित्रपटाला झाला आहे. अपेक्षा केली जात आहे की, तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी या चित्रपटाच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन कृष आणि कंगना राणावतने केले आहे. चित्रपटात कंगनाच्या व्यतिरिक्त अंकिता लोखंडे, डॅनी डेंग्जोंगपा आणि सुरेश औबेरॉय सारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

काही चित्रपट समिक्षकांच्या मते, या चित्रपटात कंगना राणावतने चांगली भूमिका साकारली आहे. समिक्षकांपासून ते प्रेक्षंकापर्यंत तीचे काम सर्वांना आवडलेले आहे. तसेच काही समिक्षकांनी चित्रपटाची पटकथा कमजोर आहे. यामुळे चित्रपट कमजोर पडला आहे, असं म्हटलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *