'केसरी'चा नवा रेकॉर्ड, दोन दिवसात विक्रमी कमाई

मुंबई : गोल्ड, पॅडमॅन आणि 2.0 सारख्या हिट चित्रपटानंतर अभिनेता अक्षय कुमार केसरी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्यानंतर अक्षय कुमार केसरी चित्रपटात नव्या भूमिकेत झळकला आहे. अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला केसरी हा सिनेमा होळीला प्रदर्शित झाला. समीक्षकांनीही या चित्रपटाचं भरभरुन कौतुक केलं आहे. प्रेक्षकांकडून या सिनेमाला प्रतिसाद मिळत …

'केसरी'चा नवा रेकॉर्ड, दोन दिवसात विक्रमी कमाई

मुंबई : गोल्ड, पॅडमॅन आणि 2.0 सारख्या हिट चित्रपटानंतर अभिनेता अक्षय कुमार केसरी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्यानंतर अक्षय कुमार केसरी चित्रपटात नव्या भूमिकेत झळकला आहे. अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला केसरी हा सिनेमा होळीला प्रदर्शित झाला. समीक्षकांनीही या चित्रपटाचं भरभरुन कौतुक केलं आहे. प्रेक्षकांकडून या सिनेमाला प्रतिसाद मिळत आहे. केसरी सिनेमाने पहिल्याच दिवशी 21.50 कोटी रुपयांची बक्कळ कमाई करत नवा रेकॉर्ड नावे केला. पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई करणाऱ्या या सिनेमाने दुसऱ्या दिवशीही कमाईत सातत्य ठेवलं. केसरीने दुसऱ्या दिवशी 16.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवल्याची माहिती, सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी दिली.

त्यामुळे दोन दिवसात या चित्रपटाने एकूण 37.76 कोटी रुपये कमावले आहेत.

जगभरात केसरी चित्रपट 4200 स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. भारतात केसरीला 3600 स्क्रीन मिळाले आहेत. चित्रपटात अक्षय कुमारसोबत परिणिती चोप्रा मुख्य भूमिकेत आहे. केसरी चित्रपट पहिल्या आठवड्यात 100 कोटींची कमाई करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.


काय आहे चित्रपटाची स्टोरी?

केसरी चित्रपट करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये तयार करण्यात आला आहे. अनुराग सिंह यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची कथा सारागढी येथील ऐतिहासीक लढाईवर आहे. यामध्ये ब्रिटीश इंडियन आर्मीचे 21 सैनिक 10 हजार अफगान सैनिकांसोबत चलाकीने युद्ध करतात. चित्रपटात अक्षय कुमारने हवालदार ईशर सिंह यांची भूमिका साकारली आहे.

2019 च्या सुरुवातीला सर्वात जास्त कमाई करणारे चित्रपट

पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई करण्यामध्ये यावेळी केसरीने गली बॉयचा (19.40 कोटी) रेकॉर्ड तोडला आहे. कॅप्टन मार्वल (13.01 कोटी) रुपये मागे टाकत केसरीने आपल्या नावावर रेकॉर्ड केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *