सैनिकांवरही दगडफेक, अजून किती स्वातंत्र्य पाहिजे? अनुपम खेर

सैनिकांवरही दगडफेक, अजून किती स्वातंत्र्य पाहिजे? अनुपम खेर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी जमावाकडून होणारा हिंसाचार आणि त्यांच्या मुलांना देशात ठेवण्यास असुरक्षित वाटत असल्याचं वक्तव्य केलं आणि राजकारण तापलं. आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची प्रतिक्रिया आली आहे. भारतात अजून किती स्वातंत्र्य हवंय, असा सवाल खेर यांनी केलाय. देशात एवढं स्वातंत्र आहे, की सैन्याविषयी अपशब्द वापरले जातात. एअर चीफविषयी वाईट बोललं […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:48 PM

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी जमावाकडून होणारा हिंसाचार आणि त्यांच्या मुलांना देशात ठेवण्यास असुरक्षित वाटत असल्याचं वक्तव्य केलं आणि राजकारण तापलं. आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची प्रतिक्रिया आली आहे. भारतात अजून किती स्वातंत्र्य हवंय, असा सवाल खेर यांनी केलाय.

देशात एवढं स्वातंत्र आहे, की सैन्याविषयी अपशब्द वापरले जातात. एअर चीफविषयी वाईट बोललं जातं आणि सैनिकांवर दगडफेक केली जाते. तुम्हाला या देशात अजून किती स्वातंत्र्य हवंय? असा तिखट सवाल अनुपम खेर यांनी नसीरुद्दीन शाह यांना केला. शिवाय त्यांना (नसीरुद्दीन शाह) वाटलं ते म्हणाले, पण जे म्हणाले ते खरंय असंही नाही, असं खेर म्हणाले. वाचा मला माझ्या मुलांची चिंता वाटते : नसीरुद्दीन शाह

काय आहे प्रकरण?

”समाजात विष पसरलंय. माझ्या मुलाच्या सुरक्षेची चिंता वाटते. कायदा हातात घेण्याची खुली सूट मिळाली आहे. मला धर्माचं शिक्षण मिळालं होतं. पण तिला (पत्नी) धर्माचं शिक्षण मिळालेलं नाही. कारण, ती लिबरल कुटुंबातून आहे. मी माझ्या मुलांना धर्माविषयी शिकवलं नाही. चांगलं आणि वाईट याचा धर्माशी संबंध नाही. पण मुलांची चिंता वाटते, की त्यांना कधी जमावाने घेरलं आणि विचारलं की तुम्ही हिंदू आहात की मुस्लीम? तर त्यांच्याकडे काहीही उत्तर नसेल”, असं नसीरुद्दीन शाह म्हणाले. वाचा ‘विराट हा उद्धट खेळाडू’ – नसरुद्दीन शाह

दरम्यान, अनुपम खेर यांनी सिनेमांच्या तिकिटावरील जीएसटी कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय. सिनेमांमुळे फक्त मनोरंजनच होत नाही, तर पर्यटनालाही चालना मिळते. त्यामुळे सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय आहे, असं ते म्हणाले. 100 रुपयांपर्यंतच्या सिनेमाच्या तिकिटावर आतापर्यंत 18 टक्के कर होता, जो आता 12 टक्के करण्यात आलाय. तर 100 रुपयांच्या वरील तिकिटावर 28 टक्के कर होता, जो आता 18 टक्के करण्यात आलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असताना सिनेक्षेत्रातील अनेक अभिनेते आणि निर्मात्यांनी मोदींची भेट घेतली होती. सिनेमावरील कर 28 टक्क्यांहून कमी करण्याची मागणी करण्यात आली होती. या निर्णयाचं निर्मात्यांनी स्वागत केलं आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें