इमरान हाश्मीच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई : अभिनेता इमरान हाश्मी याच्या येणाऱ्या ‘चीट इंडिया’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना इमरान एका वेगळ्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. इमरान हा एकेकाळी किसिंग हिरो म्हणून ओळखला जायचा, मात्र काही काळापासून इमरान अत्यंत गंभीर आणि वेगळ्या भूमिका साकारतो आहे. तसचं काहीसं वेगळेपण इमरानच्या या चित्रपटात दिसून येत आहे. या चित्रपटात तो …

Imraan Hashmi, इमरान हाश्मीच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई : अभिनेता इमरान हाश्मी याच्या येणाऱ्या ‘चीट इंडिया’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना इमरान एका वेगळ्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. इमरान हा एकेकाळी किसिंग हिरो म्हणून ओळखला जायचा, मात्र काही काळापासून इमरान अत्यंत गंभीर आणि वेगळ्या भूमिका साकारतो आहे. तसचं काहीसं वेगळेपण इमरानच्या या चित्रपटात दिसून येत आहे. या चित्रपटात तो एका चीटर प्रोफेसरची भूमिका निभावतो आहे, जो इंजिनीअरिंग आणि मेडिकलच्या विद्यार्थांकडून पैसे घेतो आणि त्यांच्या जागी हुशार मुलांना परीक्षेला पाठवतो. हाच त्याचा धंदा आहे ज्याने त्याला करोडपती बनवले आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये इमरानचा एक डायलॉग आहे, ‘मुझे हीरो बनने की इच्‍छा नहीं है, विलेन बनने का बिल्कुल टाइम नहीं है, खिलाडी हूं बस खेल रहा हूं…’

हा चित्रपट 25 जानेवारी 2019 ला प्रदर्शित होणार आहे. याचं प्रोडक्शन टी-सीरीज, तनूज गर्ग आणि अतुल कस्बेकरच्या एलिपसीस एंटरटेनमेंट आणि इमरान हाश्मी फिल्म्स करत आहेत. याचे निर्देशक सौमिक सेन करत आहेत.

हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. यामध्ये भारतीय शैक्षणिक व्यवस्थेतील फोलपणा दाखवण्यात आला आहे. शैक्षणिक व्यवस्था कशाप्रकारे भ्रष्ट झाली आहे, हे यात दाखवण्यात आले आहे. तर इमराननेही एका भ्रष्ट प्राध्यापकाची भूमिका चोख रंगवली आहे.

श्रेया धनवंतरी ही या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. तिने याआधी 2010 ला तेलगू चित्रपट ‘स्नेह गीतम’मध्ये काम केले आहे. तिने अनेक वेबसीरिजमध्येही काम केले आहे. यश राज फिल्म्सची वेबसीरिज ‘लेडिज रुम’ ही श्रेयाच्या प्रसिद्ध वेबसीरिजपैकी एक आहे. यात तिने श्रेया खन्ना नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती, जी तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *