सुपरस्टार विजयच्या घरावर आयकराचे छापे, फायनान्सरच्या घरात खचाखच भरलेल्या पैशाच्या बॅगा

दक्षिणेकडील सुपरस्टार विजयच्या घरावर आयकराची धाड पडली आहे. सुपरस्टार विजयवर (IT raid on Tamil actor Vijay) आयकर चोरीचा आरोप आहे.

सुपरस्टार विजयच्या घरावर आयकराचे छापे, फायनान्सरच्या घरात खचाखच भरलेल्या पैशाच्या बॅगा
Follow us
| Updated on: Feb 06, 2020 | 1:20 PM

बंगळुरु : दक्षिणेकडील सुपरस्टार विजयच्या घरावर आयकराची धाड पडली आहे. सुपरस्टार विजयवर (IT raid on Tamil actor Vijay) आयकर चोरीचा आरोप आहे. त्यामुळेच इन्कम टॅक्स विभागाची त्याच्यावर वक्रदृष्टी पडली.   विजयच्या घरावर (IT raid on Tamil actor Vijay)आयकराची धाड पडली त्यावेळी विजय तामिळनाडूतील नेयवली कोलसा खाणीत त्याच्या आगामी सिनेमाचं शूटिंग करत होता.  मात्र या छापेमारीमुळे विजयला शूटिंग अर्धवट सोडून घरी परतावं लागलं.

एजीएस एंटरप्रायजेस या कंपनीवरील छापेमारीदरम्यान, सुपरस्टार विजयला बिजली या सिनेमासाठी दिलेल्या पैशांवरुन गडबड झाल्याचं आढळलं. त्याबाबत आयकर विभागाने अधिक चौकशी केली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विजयला या सिनेमासाठी मोठी रक्कम मिळाल्याची कुणकुण आधीच आयकर विभागाला लागली होती.

त्याआधी इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी विजयच्या फायनान्सच्या घरातून पैशाच्या बॅग जप्त केल्या. खचाखच भरलेल्या पैशाच्या बॅग आढळून आल्या.

आयकर विभागाने काल 5 फेब्रुवारीला विजयच्या शालीग्राम आणि पनैयूर इथल्या घरांवर धाडी टाकल्या. त्या धाडी आज पुन्हा सुरु केल्या.

विजयच्या घरी इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी छापेमारी केल्याची बातमी जसी पसरली, तसं सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. #WestandwithVijay हा हॅशटॅग ट्रेंड झाला. विजय करचोरी करु शकत नाही, असा दावा त्याचे फॅन्स करत आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.