प्रियांकाची आई भाजप समर्थक? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान काल 29 एप्रिलला पार पडले. यावेळी मुंबईत सेलिब्रिटींनी मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घेतला. अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही तिची आई मधू चोप्रा यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर प्रियांका चोप्राने इंन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लोकांना मतदान करण्याचं आवाहनही केलं. प्रियांकाच्या आई मधू चोप्रा यांनीही ट्विटरवर मतदान केल्याचा फोटो …

प्रियांकाची आई भाजप समर्थक? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान काल 29 एप्रिलला पार पडले. यावेळी मुंबईत सेलिब्रिटींनी मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घेतला. अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही तिची आई मधू चोप्रा यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर प्रियांका चोप्राने इंन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लोकांना मतदान करण्याचं आवाहनही केलं. प्रियांकाच्या आई मधू चोप्रा यांनीही ट्विटरवर मतदान केल्याचा फोटो शेअर केला. मात्र, हा फोटो आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे.


मुंबईमध्ये सोमवारी झालेल्या मतदानानंतर मधू चोप्रा यांनी एक फोटो ट्वीट केला. त्यासोबत त्यांनी – ‘My vote matters!!’ असं लिहिलं. महत्त्वाचं म्हणजे, या फोटोमध्ये मधू चोप्रा यांच्या गळ्यात भाजपचं निवडणूक चिन्ह असलेला गमछा होता. त्यामुळे मधू चोप्रा या भाजप समर्थक असल्याचा अंदाज लावला जात आहे.

मधू चोप्रा यांच्या या ट्विटर हँडलवर ब्लू टीक नाही. पण, प्रियांका चोप्रा स्वत: या हँडलला फॉलो करत असल्याने हे मधू चोप्रा यांचंच अकाऊंट असल्याचं म्हटलं जात आहे. मधू चोप्रा यांचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या फोटोवर अनेक कमेंट्सही येत आहेत. अनेकांनी मधू चोप्रा यांनी भाजपचं समर्थन केल्याने आनंद व्यक्त केला.

मधू चोप्रा या व्यवसायाने डॉक्टर आहेत. नुकतंच त्यांनी मुंबईत एक क्लिनिक उघडलं. तसेच, त्या निर्मात्याही आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *