‘इतनी शक्ति हमे देना दाता’चे रचनाकार अभिलाष कालवश, कर्करोगाशी झुंज संपली

अभिलाष (lyricist Abhilash) यांना यकृताचा कर्करोग (Liver Cancer) झाला होता. गेल्या 10 महिन्यांपासून आजार बळावल्याने ते अंथरुणाला खिळले होते.

'इतनी शक्ति हमे देना दाता'चे रचनाकार अभिलाष कालवश, कर्करोगाशी झुंज संपली
Follow us
| Updated on: Sep 28, 2020 | 5:49 PM

मुंबई : ‘अंकुश’ या चित्रपटातील ‘इतनी शक्ती हमें देना दाता’ या गाण्याचे गीतकार अभिलाष (lyricist Abhilash) यांचे मुंबईत निधन झाले आहे. 74 वर्षीय अभिलाष यांनी रविवारी गोरेगाव येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अभिलाष गेल्या काही महिन्यांपासून यकृताच्या कर्करोगाशी (Liver Cancer) झुंज देत होते. मागील 10 महिन्यांपासून ते अंथरुणाला खिळून होते. आर्थिक अडचणींमुळे त्यांचे यकृत प्रत्यारोपण होऊ शकले नव्हते. दरम्यान, आज (28 सप्टेंबर) पहाटे 4 च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले (Itani Shakti hame dena data fame lyricist Abhilash Passed away due to liver cancer).

‘इतनी शक्ती हमे देन दाता…’ 8 भाषांत अनुवादित झाले

गीतकार अभिलाष (lyricist Abhilash) यांनी 1985मध्ये ‘अंकुश’ या चित्रपटासाठी रचलेली प्रार्थना ‘इतनी शक्ती हमे देन दाता…’ विशेष गाजली. या प्रार्थनेचा 8 भाषांमध्ये अनुवाद देखील करण्यात आला आहे. आजही अनेक शाळांमध्ये ही प्रार्थना म्हटली जाते. या प्रार्थनेसोबतच अभिलाष यांनी ‘सांझ भई घर आजा’, ‘आज की रात न जा’, ‘वो जो खत मुहब्बत में’, ‘तुम्हारी याद के सागर में’, ‘संसार है इक नदिया’, ‘तेरे बिन सूना मेरे मन का मंदिर’ ही गाणी रचली होती. याशिवाय ‘रफ्तार’ (1975), ‘जहरिली’ (1977), ‘सावन को आने दो’ (1979), ‘लाल चूडा’ (1974), ‘अंकुश’ (1986), ‘हलचल’ (1995) आणि ‘मोक्ष’ (2013) सारख्या चित्रपटांसाठीदेखील त्यांनी गाणी लिहिली होती. गीतकार अभिलाष यांना माजी राष्ट्रपती ज्ञानी जैल सिंह यांच्या हस्ते ‘कलाश्री पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले होते.

वयाच्या 12व्या वर्षी गीत लेखनाची सुरुवात

13 मार्च 1946 रोजी दिल्लीत अभिलाष (lyricist Abhilash) यांचा जन्म झाला. अभिलाष यांचे वडील व्यावसायिक होते. अभिलाष यांनीदेखील व्यवसायमध्ये हातभार लावावा, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र, अभिलाष यांची रूची कला-साहित्या क्षेत्राकडे होती. वयाच्या 12व्या वर्षापासूनच अभिलाष कविता लिहायला लागले होते. मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी कवितांचे कार्यक्रम सादर करायला सुरुवात केली.(Itani Shakti hame dena data fame lyricist Abhilash Passed away due to liver cancer)

आजारपणामुळे आर्थिक परिस्थिती खालावली

अभिलाष (lyricist Abhilash) यांना यकृताचा कर्करोग (Liver Cancer) झाला होता. गेल्या 10 महिन्यांपासून आजार बळावल्याने ते अंथरुणाला खिळले होते. काही कालावधी पूर्वी त्यांची आतड्यांची शस्त्रक्रिया झाली होती. यामुळे त्यांच्या चालण्या-फिरण्यावर बंधने आली होती. या आजारपणात जवळचे सगळे पैसे संपले. सुरुवातीला त्यांना काही ठिकाणाहून मदत मिळाली होती. मात्र, आर्थिक चणचणीमुळे त्यांची यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया रखडली होती.

(Itani Shakti hame dena data fame lyricist Abhilash Passed away due to liver cancer)

संबंधित बातम्या : 

ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर ​यांचं 84 व्या वर्षी निधन

Ashalata Wabgaonkar | ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन, मालिकेच्या शुटींगदरम्यान लागण

सूरांचा बादशाह हरपला, ज्येष्ठ पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.