Kangana Ranaut | …हा तर लोकशाहीचा विजय; न्यायालयाच्या निर्णयानंतर कंगनाचा पलटवार

तुम्ही खलनायकाची भूमिका निभावली म्हणून मी हिरो ठरले, असा टोलाही तिने ठाकरे सरकारला लगावला. (Its Only Cause You Play a Villain So I Can Be a HERO, Kangana Ranaut Criticize Thackeray Government)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:25 PM, 27 Nov 2020

मुंबईः जेव्हा एखादी व्यक्ती सरकारच्याविरोधात उभी राहते आणि जिंकते, तेव्हा तो त्या व्यक्तीचा विजय नसतो, तर लोकशाहीचा विजय असतो, असं म्हणत अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने ठाकरे सरकारवर पलटवार केला. ज्यांनी मला धैर्य दिले, त्या प्रत्येकाचे आभार आणि ज्यांनी माझ्या तुटलेल्या स्वप्नांची चेष्टा केली त्यांचेही आभार. तुम्ही खलनायकाची भूमिका निभावली म्हणून मी हिरो ठरले, असा टोलाही तिने ठाकरे सरकारला लगावला. (Its Only Cause You Play a Villain So I Can Be a HERO, Kangana Ranaut Criticize Thackeray Government)

हायकोर्टाच्या निर्णयानंतर कंगनानं ट्विट करत भावनांना वाट मोकळी करून दिली. अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) वांद्र्यातील कार्यालयाच्या पाडकामप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) मुंबई महापालिकेला (BMC) मोठा झटका दिला. कंगनाच्या इमारतीचे केलेले पाडकाम बेकायदेशीर ठरवत हायकोर्टाने बीएमसीने पाठवलेली नोटीसही अवैध ठरवली आहे.


याचिकाकर्त्या कंगना रनौतने सोशल मीडियावर मत व्यक्त करताना काळजी घ्यावी. तिने केलेल्या ट्विट किंवा वक्तव्यांवर हायकोर्ट सहमत नाही. मात्र एखाद्या व्यक्तीने कितीही अयोग्य मतं व्यक्त केली, तरी शासन पूर्वग्रह ठेवून अशा व्यक्तींवर कारवाई करू शकत नाही, असंही हायकोर्टाने सुनावलं.

कंगनाची वास्तू नवी नाही, जुनीच आहे. पालिकेने केलेली कारवाई चुकीची आणि बेकायदेशीर आहे. महापालिकेने 7 आणि 9 सप्टेंबर रोजी ज्या नोटिसा पाठवल्या होत्या, त्या रद्द करत असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. हायकोर्टाने मूल्यांकन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, त्यांना कंगनाच्या नुकसानभरपाईचा मूल्यांकन अहवाल मार्च 2021 पर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयावर 9 सप्टेंबरला महापालिकेचा हातोडा पडला होता. कंगनाच्या याचिकेनंतर हायकोर्टाने पाडकामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले. तसेच पालिकेला आपले म्हणणे मांडण्याच्या सूचना दिल्या. या पार्श्वभूमीवर कंगनाने आधी आपल्या ऑफिसला राम मंदिराची उपमा देत बीएमसीची तुलना बाबराशी केली, नंतर तिने थेट पाकिस्तान असे लिहित लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात केला होता.

हेही वाचा :

शेतकऱ्यांची दहशतवाद्यांशी तुलना, कंगनाविरोधात तक्रार दाखल

पुलवामापेक्षा जास्त नागरिक तुम्ही भिवंडीत मारले, कंगनाचा ठाकरेंवर पुन्हा हल्ला

(Its Only Cause You Play a Villain So I Can Be a HERO, Kangana Ranaut Criticize Thackeray Government)