Breakup Story | ‘या’ सवयीमुळे झाला होता जॅकलिन-साजिद खानचा ब्रेकअप, वाचा या अधुऱ्या प्रेमकहाणीबद्दल..

बॉलिवूडमधील काही लव्ह स्टोरीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते जितके उत्सुक असतात, तितकेच चाहते त्यांच्या विभक्त होण्याची कहाणी ऐकण्यासही उत्सुक असतात. अशीच एक अधुरी प्रेमकहाणी म्हणजे जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि साजिद खान (Sajid Khan).

Breakup Story | ‘या’ सवयीमुळे झाला होता जॅकलिन-साजिद खानचा ब्रेकअप, वाचा या अधुऱ्या प्रेमकहाणीबद्दल..
साजिद-जॅकलिन

मुंबई : बॉलिवूडमधील काही लव्ह स्टोरीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते जितके उत्सुक असतात, तितकेच चाहते त्यांच्या विभक्त होण्याची कहाणी ऐकण्यासही उत्सुक असतात. अशीच एक अधुरी प्रेमकहाणी म्हणजे जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि साजिद खान (Sajid Khan). दोघांचे अफेअर आणि ब्रेकअप बद्दल बर्‍याच चर्चा सुरु असतात (Jacqueline Fernandez and Sajid Khan breakup story).

जॅकलिन फर्नांडिस जेव्हा बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सेटिंग करत होती, तेव्हा ती साजिद खानबरोबर नातेसंबंधात होती. बराच काळ नात्यात राहिल्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला होता. आज आम्ही तुम्हाला जॅकलिन आणि साजिद खानच्या ब्रेकअप कथेबद्दल सांगणार आहोत.

साजिदसाठी केले ‘डंप’

2006मध्ये मिस श्रीलंका युनिव्हर्सचा मुकुट जिंकल्यानंतर जॅकलिन फर्नांडिस बॉलिवूडकडे वळली. 2009मध्ये ‘अलादीन’ या चित्रपटाद्वारे अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटाने फारशी जादू केली नसली तरी, जॅकलिन चाहत्यांच्या मनापर्यंत पोहचली होती. दिग्दर्शक साजिद खानसोबत तिच्या नात्याची बातमी जेव्हा चर्चेत आली, तेव्हा ही अभिनेत्री जास्तच चर्चेत आली होती.

जर अहवालांवर विश्वास ठेवला, तर जॅकलिन फर्नांडिसने प्रिन्स शेख हसन यांना देखील डेट केले होते. 2011मध्ये अभिनेत्रीने शेख हसनसोबत ब्रेकअप केला होता, साजिद खान त्यांच्या विभक्त होण्याचे कारण होते असे म्हटले जाते. असे म्हटले जाते की, जेव्हा जॅकलिन शेखला डेट करत होती, त्याचवेळी ती साजिदच्या जवळ आली होती, यामुळे शेखने अभिनेत्रीशी असलेले संबंध तोडले होते (Jacqueline Fernandez and Sajid Khan breakup story).

अभिनेत्रीचा ग्लॅमरस अवतार साजिदला आवडला नाही!

‘हाऊसफुल’ चित्रपटानंतर साजिद आणि जॅकलिनची जवळीक वाढली. स्वतः जॅकलिन म्हणाली होती की, साजिदच्या प्रेमाची हवा तिच्या डोक्यात गेली आहे. पण, साजिद तिच्यावर अनेक निर्बंध लादत असे. त्याला जॅकलिनने लहान कपडे घालणे अजिबात आवडत नव्हते. इतकेच नाही तर, तो कोणत्याही चित्रपटात जॅकलिनने ग्लॅमरस व्यक्तिरेखा साकारण्याच्या तीव्र विरोधात होता.

दोघेही विभक्त झाले!

मात्र, तरीही अभिनेत्रीने साजिद खानबद्दल बोलताना नेहमीच म्हटले की, तो खूप सपोर्टिव्ह आहे आणि नेहमीच योग्य सल्ला देतो. परंतु, साजिदचे हेच निर्बंध त्यांच्या विभक्त होण्याचे कारण ठरले होते. जॅकलिन मोकळ्या मनाने चित्रपटांमध्ये आपले काम करू इच्छित होती. यामुळेच 2013मध्ये तिने साजिदशीही ब्रेकअप केला होता. ही जोडी विभक्त होऊन बराच काळ लोटला आहे, परंतु हे दोघे अजूनही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. म्हणूनच जॅकलिनने हे स्पष्ट केले आहे की, जर साजिदने तिला कधी चांगला चित्रपट ऑफर केला, तर ती नक्कीच स्वीकारेल.

(Jacqueline Fernandez and Sajid Khan breakup story)

हेही वाचा :

Top 5 Marathi Serial | मालिकांच्या शर्यतीत ‘देवमाणूस’ची एंट्री, पाहा या आठवड्याच्या अव्वल मालिका

Nisha-Karan Mehra | करण-निशाच्या वादानंतर सोशल मीडियावर चर्चेत आलाय ‘हा’ बेडरूम व्हिडीओ !