जान्हवीच्या आगामी सिनेमाचा लूक व्हायरल

मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या आपल्या नवीन सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. जान्हवीकडे सध्या दोन बड्या बजेटचे सिनेमे असल्याची माहिती आहे. त्यातच आता जान्हवीच्या आगामी सिनेमाचा लूक सोशल मीडियावर लीक झाला आहे. रिपोर्ट्सनुसार जान्हवी एआयएफ पायलट गुंजन सक्सेनाच्या बायेपिकमध्ये काम करत आहे. ती यामध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे. या बायोपिकमधील जान्हवीचा फर्स्ट लूक सध्या सोशल …

जान्हवीच्या आगामी सिनेमाचा लूक व्हायरल

मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या आपल्या नवीन सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. जान्हवीकडे सध्या दोन बड्या बजेटचे सिनेमे असल्याची माहिती आहे. त्यातच आता जान्हवीच्या आगामी सिनेमाचा लूक सोशल मीडियावर लीक झाला आहे. रिपोर्ट्सनुसार जान्हवी एआयएफ पायलट गुंजन सक्सेनाच्या बायेपिकमध्ये काम करत आहे. ती यामध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे. या बायोपिकमधील जान्हवीचा फर्स्ट लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सिनेमाबाबत कुठलेही अधिकृत स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या जान्हवीच्या फोटोवरुन असा दावा केला जात आहे की, हा लूक तिच्या येणाऱ्या सिनेमाचा आहे.

गुंजन सक्सेना या पहिल्या भारतीय महिला आयएएफ होत्या. कारगिल युद्धादरम्यान त्यांनी युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना रुग्णालयात पोहोचवण्याचे काम केले होते. गुंजन सक्सेना यांना त्यांच्या शौर्यासाठी शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले होते.

या सिनेमाचे दिग्दर्शक, निर्माते कोण असणार आहेत, याबाबतही कुठलीही अधिकृत माहिती नाही.

‘धडक’ सिनेमातून जान्हवीने बॉलिवुडमध्ये एंट्री केली होती. तिचा हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. धडक हा सिनेमा मराठी सुपरहिट ‘सैराट’चा रिमेक होता. यात जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर मुख्य भूमिकेत होते. 2019 मध्ये जान्हवीकडे दोन  सिनेमे आहेत. एक गुंजन सक्सेना यांची बायोपिक आणि दुसरा करण जौहरचा ‘तख्त’, या सिनेमात जान्हवीबरोबर रणवीर सिंह, आलिया भट्ट, करिना कपूर, भुमी पेडणेकर आणि अनिल कपूर दिसणार आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *