‘यंग अर्थ चॅम्पियन्‍स’चं दुसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; जिम सर्भ परीक्षकाच्या भूमिकेत

प्रोफेसर अमृतांशू श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखालील पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील आयआयटी-बॉम्बे तज्ञांकडून महिनाभर चालणा-या या स्पर्धेचे मूल्यमापन केले जाईल. प्रवेशिकांचे परीक्षण करण्‍यामध्‍ये जिम सर्भ (Jim Sarbh) देखील महत्त्वाची भूमिका बजावेल.

'यंग अर्थ चॅम्पियन्‍स'चं दुसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; जिम सर्भ परीक्षकाच्या भूमिकेत
jim sarbhImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 7:45 AM

‘सोनी बीबीसी अर्थ’वर (Sony BBC Earth) लवकरच ‘यंग अर्थ चॅम्पियन्‍स’चे (Young Earth Champions) दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही स्‍पर्धा इयत्ता ६वी ते ९वी पर्यंतच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी स्‍पर्धात्‍मक अनुभवाची निर्मिती करण्‍यास सज्‍ज आहे. यंदाची थीम ‘संवर्धन’च्‍या गरजेबाबत संवादांना चालना देण्‍याशी संबंधित आहे. स्‍पर्धेमध्‍ये निसर्गाची संसाधने – पाणी, जमिन, वन्‍यजीव, जंगल व ऊर्जा यांचे संवर्धन कशाप्रकारे करता येईल यांसदर्भातील नवीन विचार पाहायला मिळतील. आपल्‍या संसाधनांचे जतन करणे आणि पर्यायी माध्‍यमांचा शोध घेणे हे निसर्गाचे संतुलन राखण्‍यासाठी अत्‍यंत महत्त्वाचे आहे. या संदेशाचा प्रसार करण्‍यासाठी ब्रॅण्‍डने अभिनेता जिम सर्भची (Jim Sarbh) निवड केली आहे.

प्रोफेसर अमृतांशू श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखालील पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील आयआयटी-बॉम्बे तज्ञांकडून महिनाभर चालणा-या या स्पर्धेचे मूल्यमापन केले जाईल. प्रवेशिकांचे परीक्षण करण्‍यामध्‍ये जिम सर्भ देखील महत्त्वाची भूमिका बजावेल. अव्‍वल १० विजेत्यांना जिम आणि प्रोफेसर यांच्याशी त्यांच्या कल्पनांवर संवाद साधण्याची आणि स्थिरतेबद्दल विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळेल. सर्वात नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या तरूणाला यंग अर्थ चॅम्पियन म्हणून नाव देण्यात येईल. तसेच त्यासोबत एक भव्‍य बक्षीस आणि सोनी बीबीसी अर्थवर झळकण्‍याची जीवनातील अमूल्‍य संधी मिळेल.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Jim Sarbh (@jimsarbhforreal)

या उपक्रमाबत अधिक माहितीसाठी www.sonybbcearth/youngearthchampions येथे लॉग ऑन करा.

”माझ्या मते, अधिक स्थिर पद्धतीने आपल्‍या पर्यावरणासोबत जगण्‍यास शिकणे हाच आपल्‍या अस्तित्‍वासाठी पर्याय आहे. केवळ स्वार्थी, संकुचित दृष्टीकोन असलेले मानवी जीवन न जगता आपण या भूतलावरील सर्व सजीवांशी कसे वागतो याचे चिंतन करणे गरजेचे आहे. माझा विश्‍वास आहे की, याची सुरूवात शिक्षणापासून होते आणि म्हणून सोनी बीबीसी अर्थने आपल्या देशातील काही तरुणांसोबत पुढाकार घेतल्याबद्दल मला आनंद होत आहे”, अशी प्रतिक्रिया जिमने दिली.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.