‘विनोदवीर’ शोधण्यासाठी जॉनी लिव्हर येणार तुमच्या गावात!

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कलेची कमी नाही. त्या कलाकारांचा शोध फक्त घ्यायला हवा. हेच हेरुन स्टार प्रवाह वाहिनी ‘एक टप्पा आऊट, कॉमेडीचा पाऊट’ नावाचा कार्यक्रमाक घेऊन येत आहे. धावपळीचं आयुष्य हसत-खेळ जगावं, यासाठी स्टार प्रवाह वाहिनीने नव्या कार्यक्रमाची मेजवानी प्रेक्षकांना देण्याचं ठरवलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून अस्सल विनोदवीरांचा शोध या कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. महाराष्ट्रात दडलेल्या […]

'विनोदवीर' शोधण्यासाठी जॉनी लिव्हर येणार तुमच्या गावात!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कलेची कमी नाही. त्या कलाकारांचा शोध फक्त घ्यायला हवा. हेच हेरुन स्टार प्रवाह वाहिनी ‘एक टप्पा आऊट, कॉमेडीचा पाऊट’ नावाचा कार्यक्रमाक घेऊन येत आहे. धावपळीचं आयुष्य हसत-खेळ जगावं, यासाठी स्टार प्रवाह वाहिनीने नव्या कार्यक्रमाची मेजवानी प्रेक्षकांना देण्याचं ठरवलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून अस्सल विनोदवीरांचा शोध या कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. महाराष्ट्रात दडलेल्या या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम करणार आहेत कॉमेडीचा बादशाहा जॉनी लिव्हर आणि मराठीतले दोन दिग्गज कलाकार.

“ह्युमर आहे म्हणूनच त्या जागी जज म्हणून जॉनी लिव्हर आहे. ‘स्टार प्रवाह’वाहिनीने नव्या विनोदी कलाकारांसाठी ‘एक टप्पा आऊट’च्या निमित्ताने मोठं व्यासपीठ उपलब्ध करुन दिलं आहे. या संधीचा लाभ सर्वांनीच घ्यायला हवा. ‘एक टप्पा आऊट’मध्ये माझा सहभाग आहे याचा एक महाराष्ट्रीयन म्हणून मला अभिमान आहे.”, अशा शब्दात अभिनेते जॉनी लिव्हर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘एक टप्पा आऊट’मध्ये जॉनी लिव्हर यांच्यासोबत विनोदाचे दोन हुकमी एक्के जजच्या भूमिकेत दिसतील. हे दोन विनोदवीर कोण असतील याची उत्सुकता आहे.

“सध्या जगाला हसण्याची आणि हसवण्याची गरज आहे. यासाठीच स्टार प्रवाह वाहिनी ‘एक टप्पा आऊट’ हा अनोखा स्टॅण्ड अप कॉमेडी शो घेऊन येत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या टॅलेण्टचा शोध या कार्यक्रमातून घेतला जाईल. दिग्गज परीक्षक आणि सुप्रसिद्ध कलाकार मंडळींच्या सानिध्यात नवख्या कलाकारांना मार्गदर्शन केलं जाईल. मनोरंजनाने परिपूर्ण असा हा कार्यक्रम असेल,” अशी भावना‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनी व्यक्त केली.

येत्या तीन मार्चपासून ‘एक टप्पा आऊट’ च्या ऑडिशन्सना सुरुवात होणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि रत्नागिरी येथे या ऑडिशन्स पार पडणार आहेत. या ऑडिशनबद्दलची माहिती लवकरच ‘स्टार प्रवाह’वाहिनीवरुन देण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.