पुणे ते मुंबई, हिंदू ते मुस्लीम, 'बिग बॉस' विजेत्या दीपिकाचा प्रवास

मुंबई : अभिनेत्री दीपिका कक्कर ‘बिग बॉस 12’ स्पर्धेची विजेती ठरली, तर क्रिकेटर श्रीशांत या स्पर्धेत रनर-अप ठरला. दीपिकाने आपला विजय कुटुंबीय आणि चाहत्यांना अर्पण केले. प्रामाणिकपणे मेहनत करत राहिल्यास आपल्याला नक्कीच यश मिळतं, असे दीपिकाने यावेळी सांगितले. दीपिकाने ‘बिग बॉस 12’ स्पर्धेसाठी जशी मेहनत घेतली, आपला संयम कायम राखत प्रामाणिकपणे एक एक पायरी वर …

पुणे ते मुंबई, हिंदू ते मुस्लीम, 'बिग बॉस' विजेत्या दीपिकाचा प्रवास

मुंबई : अभिनेत्री दीपिका कक्कर ‘बिग बॉस 12’ स्पर्धेची विजेती ठरली, तर क्रिकेटर श्रीशांत या स्पर्धेत रनर-अप ठरला. दीपिकाने आपला विजय कुटुंबीय आणि चाहत्यांना अर्पण केले. प्रामाणिकपणे मेहनत करत राहिल्यास आपल्याला नक्कीच यश मिळतं, असे दीपिकाने यावेळी सांगितले. दीपिकाने ‘बिग बॉस 12’ स्पर्धेसाठी जशी मेहनत घेतली, आपला संयम कायम राखत प्रामाणिकपणे एक एक पायरी वर चढत गेली, तसेच तिने वैयक्तिक आयुष्यातील प्रवासही स्ट्रगल असणारा आहे.

‘ससुराल सिमर का’ या मालिकेतील ‘सिमर भाद्वाज’ या भूमिकेमुळे दीपिका घराघरात पोहोचली. तिला या भूमिकेने ओळख दिली. त्यानंतर दीपिका ‘झलक दिखला जा’ कार्यक्रमाच्या आठव्या मोसमातील स्पर्धक, ‘नच बलिए 8’ कार्यक्रमाची स्पर्धकही होती. त्यानंतर दीपिकाने ‘बिग बॉस’मध्ये सहभाग घेतला आणि ति जिंकलीही. जेपी दत्ता यांच्या ‘पल्टन’ सिनेमातून दीपिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा एकंदरीत प्रवास दिसतो तेवढा सरळ-साधा नव्हता.

6 ऑगस्ट 1986 रोजी दीपिका पुण्यात जन्म झाला. सीबीएसईमधून शिक्षण घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दीपिकाने जेट एअरवेजमध्ये तीन वर्षे एअर हॉस्टेस म्हणून काम केले. मात्र, आरोग्याचं कारण देत जेट एअरवेजची नोकरी सोडली आणि तिने एंटरटेन्मेंटच्या जगात प्रवेश केला.

रिश्ता डॉट कॉममध्ये पहिल्यांदा दीपिका दिसली, त्यानंतर ‘नीर भरे तेरे नैना देवी’मध्ये लक्ष्मीची भूमिका तिने साकारली. ‘अगले जनम मोहे बिटियाँ ही किजो’मधील रेखाची भूमिकाही गाजली.

दीपिकाला खरी ओळख मिळाली, ती ‘ससुराल सिमर का’ या मालिकेमुळे. यातील ‘सिमर’च्या भूमिकेमुळे दीपिका घराघरात पोहोचली. यात अभिनेता शोएब इब्राहिम हा दीपिकाचा सहकलाकार होता. शोएबशीच दीपिकाने 22 फेब्रुवारी 2018 रोजी म्हणजे याच वर्षी लग्न केलं. शोएबशी लग्न केल्यानंतर दीपिकाने धर्मांतर करुन दीपिकाचं नाव ‘फैजा’ असे केले. त्याआधी 2013 साली रौनक मेहता याच्याशी दीपिकाने लग्न केले होते. मात्र 2015 पर्यंतच ते लग्न टिकलं. त्यानंतर दीपिका आणि रौनकचा घटस्फोटो झाला. आता दीपिकाने शोएबसोबत लग्न करुन आपला संसार करत आहे.

दीपिकाचं बॉलिवूडमधील पदार्पण जेपी दत्ता यांच्या ‘पल्टन’ सिनेमातून याच वर्षी झालं. ‘कॅप्टन पृथ्वी सिंग डगर फियान्स’ची भूमिका बजावली होती. त्यानंतर तिने बिग बॉसमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे सिनेमांच्या प्रवासाला काहीसा ब्रेक मिळाला. मात्र, दीपिका आता पुन्हा सिनेमांकडे वळण्याच्या तयारीत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *