माधुरी-आलियाच्या दिलखेच अदा, ‘कलंक’ सिनेमातील पहिलं गाणं रिलीज

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या ‘कलंक’ सिनेमातील पहिलं गाणं ‘घर मोरे परदेसिया’ रिलीज करण्यात आलं. हे गाणं भारतीय शास्त्रीय संगितावर आधारित आहे. यामधील आलिया भट्ट आणि माधुरी दीक्षित यांची जुगलबंदी जबरदस्त आहे. हे गाणं रिलीज झाल्यानंतर काहीच तासांत याला 14 मिलिअन म्हणजेच 14 कोटींच्यावर व्ह्युज मिळाले आहे.   View this …

माधुरी-आलियाच्या दिलखेच अदा, ‘कलंक’ सिनेमातील पहिलं गाणं रिलीज

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या ‘कलंक’ सिनेमातील पहिलं गाणं ‘घर मोरे परदेसिया’ रिलीज करण्यात आलं. हे गाणं भारतीय शास्त्रीय संगितावर आधारित आहे. यामधील आलिया भट्ट आणि माधुरी दीक्षित यांची जुगलबंदी जबरदस्त आहे. हे गाणं रिलीज झाल्यानंतर काहीच तासांत याला 14 मिलिअन म्हणजेच 14 कोटींच्यावर व्ह्युज मिळाले आहे.

 

View this post on Instagram

 

And it’s here.. Full link in bio. #gharmorepardesiya ?????

A post shared by Alia ? (@aliaabhatt) on

या गाण्यामध्ये आलिया भट्ट आणि माधुरी दीक्षितच्या दिलखेच अदा मन मोहून घेतात. या गाण्यामध्ये आलिया आणि माधुरीसोबतच वरुण धवनही दिसत आहे. पण यामध्ये आलिया ही सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली आहे. हे गाणं जितकं सुंदर आहे, आलियाने यात तितकाच सुंदर डान्सही केला आहे. तिने पहिल्यांदा इंडियन क्लासिकल डान्स स्टेप्स करण्याचा प्रयत्न केला आहे. या गाण्याची कोरिओग्राफी ही रेमो डिसुझाने केली आहे.

या गाण्याला संगीतकार प्रीतमने संगीत दिलं आहे. तर अमिताभ भट्टाचार्यने हे गाणं लिहिलं आहे. गायिका श्रेया घोषाल आणि वैशाली माडेने गाणं गायलं आहे.

‘कलंक’ हा सिनेमा मल्टी-स्टारर सिनेमा आहे. अभिनेता वरुण धवन, अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता आदित्य रॉय-कपूर, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त आणि कुणाल खेमू या सिनेमात दिसणार आहेत. अभिषेक वर्मन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. तर करण जोहर या सिनेमाचा निर्माता आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात 17 तारखेला ‘कलंक’ सिनेमा रिलीज होणार आहे.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *