राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कांचन नायक कालवश

1989 मध्ये स्मिता तळवलकर यांची निर्मिती असलेल्या 'कळत नकळत' या चित्रपटातून कांचन नायक यांनी विवाहबाह्य संबंधासारखा विषय हाताळण्याचे धाडस दाखवले होते. (Director Kanchan Nayak Passed Away)

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कांचन नायक कालवश

पुणे : ‘कळत नकळत’ सारख्या चित्रपटातून ऐशीच्या दशकात धाडसी विषय मोठ्या पडद्यावर मांडणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कांचन नायक यांचे निधन झाले. पुण्यात वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Director Kanchan Nayak Passed Away)

1989 मध्ये स्मिता तळवलकर यांची निर्मिती असलेल्या ‘कळत नकळत’ या चित्रपटातून कांचन नायक यांनी विवाहबाह्य संबंधासारखा विषय हाताळण्याचे धाडस दाखवले होते. कौटुंबिक ताणतणावाची भावविभोर उकल असलेल्या या सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यातही आले होते. या चित्रपटात विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अशोक सराफ, अश्विनी भावे यांच्या मुख्य भूमिका होत्या. ‘हे एक रेशमी घरटे’, ‘नाकावरच्या रागाला औषध काय’ यासारख्या गाण्यांसह आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

गेली साडे चार दशकं कांचन नायक मनोरंजन विश्वात कार्यरत होते. जब्बार पटेल, राजदत्त, प्रभाकर नायक, दिनकर डी पाटील यांच्यासारख्या दिग्गजांसोबतही त्यांनी काम केलं होतं. अनेक चित्रपट, माहितीपट आणि मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. झी मराठीवर त्यांनी दिग्दर्शित केलेली ‘बंधन’ मालिकाही गाजली होती.

कांचन नायक यांच्या दोन चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. कळत नकळत आणि ‘विश्वनाथ एक शिंपी’ या चित्रपटासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. ‘राजू’ या सांगीतिक सिनेमातून, तर ‘दणक्यावर दणके’ या विनोदी सिनेमातून त्यांनी वेगळा बाजही दाखवला होता.

अभिनेते सुबोध भावे यांनीही ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे. संवेदनशील दिग्दर्शक आणि माणूस हरपल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

(Director Kanchan Nayak Passed Away)

हेही वाचा : Sushant Singh Rajput | मैत्रिणीसोबत तणावाचे संबंध, सुशांतसिंह राजपूतच्या नोकराचा दावा

(Director Kanchan Nayak Passed Away)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *