‘गल्ली बॉय’ नंतर सोशल मीडियावर ‘कल्लू बॉय’ व्हायरल

‘गल्ली बॉय’ नंतर सोशल मीडियावर ‘कल्लू बॉय’ व्हायरल


मुंबई : फरहान अख्तर, जोया अख्तर आणि रितेश सिधवानी निर्मित ‘गल्ली बॉय’हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या सिनेमात अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून ट्रेलरलाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. या सिनेमाचं ‘अपना टाईम आएगा’ हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्यासाठी रणवीरचे सर्वत्र कौतुकही होत आहे.

‘गल्ली बॉय’च्या या ट्रेलरनंतर याचा एक स्पूफ व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओला रणवीरच्या ट्रेलरपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळतो आहे. या स्पूफ व्हिडीओमध्ये सिनेमाचं नाव ‘कल्लू बॉय’ ठेवण्यात आलं आहे. तर यातील ‘अपना टाईम आएगा’ हे गाणं ‘अपना निखार आएगा’च्या रुपात दाखवण्यात आलं आहे. या ट्रेलरमध्ये एका सावळ्या मुलाची कहाणी दाखवण्यात आली आहे. हा स्पूफ व्हिडीओ खूप विनोदी आहे. विक्की मंडलकडून हा व्हिडीओ 1 फेब्रुवारीला अपलोड करण्यात आला.

सिंबानंतर आता रणवीर सिंह हा मुंबईच्या एका चाळीत राहणाऱ्या मुलाची भूमिका निभावतो आहे. ‘गल्ली बॉय’ सिनेमाच्या ट्रेलरवरुन या सिनेमाची कहाणी जरा हटके असल्याचं दिसत आहे. यामध्ये रणवीर सोबतच आलियाची भूमिकाही जबरदस्त वाटत आहे. हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डे ला प्रदर्शित होतो आहे.

VIDEO :

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI