आज आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यांचा आनंद लुटतोय : कंगना रणावत

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानामध्ये अनेक सेलिब्रिटींनी रांगेत उभं राहून मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर प्रतिक्रिया देताना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन या सेलिब्रिटींनी केलं. तर अभिनेत्री कंगना रणावतने आपण सध्या खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य जगत असल्याचं म्हटलंय. “हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. पाच वर्षांमध्ये एकदाच हा दिवस येतो. माझं आवाहन आहे की सर्वांनी मतदानाच्या […]

आज आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यांचा आनंद लुटतोय : कंगना रणावत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानामध्ये अनेक सेलिब्रिटींनी रांगेत उभं राहून मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर प्रतिक्रिया देताना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन या सेलिब्रिटींनी केलं. तर अभिनेत्री कंगना रणावतने आपण सध्या खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य जगत असल्याचं म्हटलंय.

“हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. पाच वर्षांमध्ये एकदाच हा दिवस येतो. माझं आवाहन आहे की सर्वांनी मतदानाच्या अधिकाराचा वापर करावा. मला असं वाटतं की माझा देश आज खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा आनंद घेतोय. कारण यापूर्वी आपण सर्व मुघल, ब्रिटीश आणि इटालियन सरकारचे गुलाम होतो. यापूर्वीच्या पक्षांनी लंडनमध्ये सुट्ट्या साजऱ्या केल्या आणि आनंद लुटला”, अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली.

कंगना नेहमीच तिच्या बिनधास्त बोलण्यासाठी ओळखली जाते. काँग्रेस सरकारवर तिने टीका केली. “काँग्रेस सरकारच्या काळात परिस्थिती वाईट होती. बलात्कार, गरीबी, प्रदूषण यांची आज जी परिस्थिती आहे, या तुलनेत काँग्रेसच्या काळात आणखी वाईट परिस्थिती होती. ही स्वराज्य आणि स्वधर्माची वेळ आहे. आपण मोठ्या प्रमाणात मतदान करायला हवं,” असं आवाहन कंगनाने केलं.

कंगनाने यापूर्वीही मोदींचं कौतुक केलं होतं. तिच्या विविध वक्तव्यांमुळे ती कायम चर्चेत असते. बॉलिवूड असो किंवा राजकारण, ती मनाला न पटलेल्या गोष्टी थेट बोलते. बॉलिवूडमधील अनेकांवरही तिने जाहीरपणे टीका केलेली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्यावरही तिने टीका केली होती.

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.