कपिल शर्माही विवाहबंधनात अडकला

मुंबई : बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचं वारं वाहत आहे. दीपिका-रणवीर, प्रियांका-निक यांच्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेकांनी लग्न केले. त्यातच 12 डिसेंबर या दिवशी सर्वात जास्त लग्न झाले. मुकेश अंबानी यांच्या मुलीचे लग्नही याच दिवशी झाले. तर प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्माही बुधवारी 12 डिसेंबरला गर्लफ्रेंड गिन्नी चतरथ सोबत विवाहबंधनात अडकला. हा विवाह सोहळा कपिलच्या होमटाऊन जालंधर येथे पंजाबी …

Kapil-Ginni Wedding, कपिल शर्माही विवाहबंधनात अडकला

मुंबई : बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचं वारं वाहत आहे. दीपिका-रणवीर, प्रियांका-निक यांच्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेकांनी लग्न केले. त्यातच 12 डिसेंबर या दिवशी सर्वात जास्त लग्न झाले. मुकेश अंबानी यांच्या मुलीचे लग्नही याच दिवशी झाले. तर प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्माही बुधवारी 12 डिसेंबरला गर्लफ्रेंड गिन्नी चतरथ सोबत विवाहबंधनात अडकला. हा विवाह सोहळा कपिलच्या होमटाऊन जालंधर येथे पंजाबी पद्धतीने पार पडला. कपिलच्या लग्नाची त्याच्या चाहत्यांना खूप काळापासून प्रतिक्षा होती. त्याच्या लग्नाचा सोहळा 10 डिसेंबर पासूनच सुरु झाला होता. यामध्ये मेहंदी आणि संगीत सोहळे झाले.

कपिलच्या लग्नाला टीव्ही जगातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली, यात कपिलच्या जवळच्या मित्रमंडळींचा समावेश होता. कपिलच्या लग्नाला अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती, कॉमेडीयन कृष्‍णा अभिषेक, कॉमेडीयन सुदेश लहरी, कॉमेडीयन भारती सिंह यांची विशेष उपस्थिती होती. लग्नापूर्वी झालेल्या विधींनाही हे सर्व उपस्थित होते.

लग्नावेळी कपिल शर्मा हा हिरव्या रंगाच्या शेरवानीत दिसला, त्यासोबतच त्याने सुंदर अशी पगडी घातली होती, तसेच त्याच्या हातात तलवार होती. तर गिन्नीने लाल रंगाचा लेहंगा घातला होता. तिचे दागिने हे जरा हटके होते.

स्टेजवर पोहोचताच कपिल आणि गिन्नीने माध्यमांना पोज दिले, यावेळी दोघेही खूप खूश दिसून आले.

लग्नानंतर कपिल दोन रिसेप्शन देणार आहे. पहिलं रिसेप्शन हे 14 डिसेंबरला अमृतसर येथे असेल तर दुसरं रिसेप्शन 24 डिसेंबरला मुंबईत ठेवण्यात आले आहे.

कपिल शर्मा लवकरच त्याच्या सुप्रसिद्ध कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’मधून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये री-एंट्री घेणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने याबाबत माहिती दिली होती.

पहा कपिल शर्माच्या लग्नाचे काही खास फोटो…

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *