सिद्धूला हटवल्यानंतर कपिल शर्माची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिद्धूने केलेल्या वक्तव्यामुळे त्याला रोषाचा सामना करावा लागत आहे. सिद्धूला सर्वात मोठा फटका बसला तो म्हणजे त्याला ‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी शोमधून हटवण्यात आलं. त्याच्या जागी अर्चना पूरनसिंहची नियुक्ती झाली आहे. या सर्व राडेबाजीनंतर ‘द कपिल शर्मा शो’चा होस्ट खुद्द कपिल शर्माने याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त …

सिद्धूला हटवल्यानंतर कपिल शर्माची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिद्धूने केलेल्या वक्तव्यामुळे त्याला रोषाचा सामना करावा लागत आहे. सिद्धूला सर्वात मोठा फटका बसला तो म्हणजे त्याला ‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी शोमधून हटवण्यात आलं. त्याच्या जागी अर्चना पूरनसिंहची नियुक्ती झाली आहे. या सर्व राडेबाजीनंतर ‘द कपिल शर्मा शो’चा होस्ट खुद्द कपिल शर्माने याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

“जर सिद्धूला हटवल्याने प्रश्न सुटणार असेल, तर ते स्वत:च शो सोडून जातील इतके ते समजूतदार आहेत, असं कपिल शर्मा म्हणाला.  तो चंदीगढमधील एका कार्यक्रमात बोलत होता.

कपिल म्हणाला, “याप्रकरणाचा तोडगा हवा. जर सिद्धूजींना शोमधून हटवल्याने प्रश्न सुटणार असेल तर ते स्वत: शो सोडून जातील. लोक #BoycottSidhu  आणि #BoycottKapilSharmaShow यासारख्या भ्रामक हॅशटॅगमुळे दिशाभूल होत आहेत”

दरम्यान, या शोमध्ये सिद्धूऐवजी अर्चना पूरन सिंह यांच्या एण्ट्रीबद्दलही कपिल शर्माने स्पष्टीकरण दिलं. सिद्धू कोणत्यातरी कामात व्यस्त असल्यामुळे अर्चना पूरन सिंह यांच्यासोबत काही एपिसोड शूट केल्याचं कपिलने सांगितलं.

कपिल नेमकं काय म्हणाला?
मला वाटतं काही ठोस तोडगा निघायला हवा. याला बॅन करा, सिद्धूला शो मधून हटवा अशा छोट्या छोट्या गोष्टी होतात. जर सिद्धूला हटवल्याने प्रश्न सुटणार असेल, तर सिद्धू स्वत: समजूतदार आहे, ते स्वत: शो मधून बाहेर पडतील. हॅशटॅग चालवून लोकांची दिशाभूल केली जाते. मला वाटतं आता मुद्द्याचं सांगायला हवं. जो मूळ प्रश्न आहे, त्यावर लक्ष द्यायला हवं, इकडे तिकडे मुद्दा भरकटून तरुणांची दिशाभूल करु नये, असं कपिल म्हणाला.

नवज्योतसिंह सिद्धू पुलवामा हल्ल्यानंतर काय म्हणाला होता?

काही लोकांमुळे संपूर्ण देशाला गुन्हेगार समजणे चुकीचे आहे. हा एक भ्याड हल्ला होता, मी याचा विरोध करतो. हिंसा ही निंदनीय आहे. मी नेहमी अहिंसेवर विश्वास ठेवतो. कोणत्याही समस्येचं समाधान हिंसा असू शकत नाही. ज्यांची चुक आहे त्यांना शिक्षा व्हायलाच हवी”, असे म्हणत सिद्धू हे पाकिस्तानची बाजू घेताना दिसले.

सिद्धू यांच्या या वक्तव्यानंतर लोकांमधील आक्रोश वाढला. अनेकांनी त्यांच्या या वक्तव्यावर आणि पाकिस्तानची बाजू घेण्यावर टीका केली. त्यांना तात्काळ ‘द कपिल शर्मा शो’मधून काढण्यात यावे ही मागणी उठू लागली. इतकेच नाही तर, ‘द कपिल शर्मा शो’ बंद करण्यात यावा अशीही मागणी होऊ लागली. त्यानंतर या कार्यक्रमाच्या आयोजकांवरील दबाव वाढला आहे, त्यामुळे सिद्धू यांना कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येऊ शकतो.

पुलवामा हल्ला :

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे गुरुवारी 14 फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. आदिल अहमद डार नावाच्या दहशतवाद्याने सुसाईट बॉम्बर बनून हा आत्मघाती हल्ला केला.

संबंधित बातम्या 

सिद्धूची मंत्रीमंडळातूनही हकालपट्टी करा, सोशल मीडियावर संताप  

‘कपिल शर्माच्या शो’मधून सिद्धू आऊट?  

सिद्धूला भारत प्रिय आहे की पाकिस्तान?  

नोटाबंदीनंतर अमित शाह आणि पंकजा मुंडेंच्या बँकेत काळा पैसा आला : सिद्धू 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *