कपील शर्मा बाबा होणार ?

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन कपील शर्मा आता बाबा होणार, अशी माहिती कपीलच्या एका जवळच्या व्यक्तीने दिली आहे. कपीलची पत्नी गिन्नी प्रेग्नेंट आहे आणि यामुळे घरात आनंदाचे वातावरण आहे. घरात येणाऱ्या नवीन पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी कपील शर्माची आईही मुंबई दाखल झाली आहे. मात्र याबाबत कपीलकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कपील शर्माने आपली बालपणीची मैत्रीण …

कपील शर्मा बाबा होणार ?

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन कपील शर्मा आता बाबा होणार, अशी माहिती कपीलच्या एका जवळच्या व्यक्तीने दिली आहे. कपीलची पत्नी गिन्नी प्रेग्नेंट आहे आणि यामुळे घरात आनंदाचे वातावरण आहे. घरात येणाऱ्या नवीन पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी कपील शर्माची आईही मुंबई दाखल झाली आहे. मात्र याबाबत कपीलकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

कपील शर्माने आपली बालपणीची मैत्रीण गिन्नी चतरथसोबत डिसेंबर 2018 मध्ये लग्न केले होते. या लग्न समारंभात बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर अवघ्या वर्षभरात कपीलने आपल्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

कपील आणि त्याचे कुटुंब या गोड बातमीमुळे खूप आनंदी आहेत, असं सांगितलं जात आहे. कपील बाबा होणार? या बातमीमुळे त्याचे चाहते सोशल मीडियावर अभिनंदन करत आहेत. तसेच त्याच्या चाहत्यांनाही नवीन बाळाची उत्सुकता लागली आहे. सध्या अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत कपीलने अजून अधिकृत घोषणा केलेली नाही.

‘द कपील शर्मा’ या  छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाने आतापर्यंत सर्वांना हसवले आहे. तसेच अनेक बॉलिवूड कालाकारांनी कौतुकही केले आहेत. सध्या कपील शर्माचा शो हा टीआरपीमध्ये टॉपला आहे. त्यामुळे कपील आणि त्याची टीम आनंदी आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *