
बॉलिवूडमधील कायम चर्चेत असणारं घराणं म्हणजे कपूर घराणे. एक काळ असा होता जेव्हा कपूर कुटुंबातील मुली आणि सुनेला काम करण्याची परवानगी नव्हती. पण आज कपूर घराण्यातील सर्वजणच बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. त्यात कपूर घराण्यातील दोन बहिणी करिश्मा कपूर आणि करीना कपूर. या दोन्ही कपूर सिस्टर्सनी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट हिट दिले आहेत. योगायोग म्हणजे करीश्माने जे जे कोस्टार राहिले आहेत त्या सर्व कोस्टारसोबत करीनाने देखील काम केलं आणि त्यातील बरेचसे चित्रपट हे सुपरहीट ठरले. कपूर कुटुंबातील या दोन्ही मुलींनी पडद्यावर पाच सेम सुपरस्टारसोबत रोमान्स केला आहे. एवढंच नाही तर करिश्मा कपूरने एकासोबत 1 मिनिटाचा किसिंग सीनही दिला आहे.
दोन्ही बहिणींनी अनेकदा सारख्या सुपरस्टार्ससोबत काम केलं आहे.
एक काळ असा होता जेव्हा कपूर कुटुंबातील मुली आणि सुनेला काम करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळेच मुमताज आणि शम्मी कपूरची जोडी जमू शकली नाही. जेव्हा नीतू कपूरने ऋषी कपूरशी लग्न केले तेव्हा ती चित्रपटांपासून दूर गेली. त्याचप्रमाणे कुटुंबातील मुलींनाही काम करण्याची परवानगी नव्हती. पण कपूर घराण्याची मोठी मुलगी करिश्मा कपूरने या सर्व प्रथा आणि बंधने तोडली आणि बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. आणि तिने हिटवर हिट सिनेमे दिले. करिश्मा कपूरनंतर, करीना कपूरनेही बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. दोन्ही बहिणींनी अनेकदा सारख्या सुपरस्टार्ससोबत काम केलं आहे.
अजय देवगण
त्यातील पहिला सुपरस्टार अजय देवगण आहे. करिश्मा कपूर आणि करिना या बहिणींमध्ये 7 वर्षांचा फरक आहे. दोघांनीही अजय देवगणसोबत काम केलं आहे. करिश्माने जिगर, सुहाग, संग्राम आणि धनवान सारख्या अनेक चित्रपटांमध्ये अजयसोबत रोमान्स केला होता. तर करीना कपूरने अजय देवगणसोबत गोलमाल, सिंघम अगेन सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
अक्षय कुमार
अक्षय कुमारने करीना कपूरसोबत ऐतराज, तलाश आणि बेवफा सारख्या चित्रपटात काम केले आहे. तर करिश्मा कपूरसोबत जानवर या चित्रपटात काम केले आहे.
शाहरुख खान
दोन्ही बहिणींनी शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर केली आहे. करीनाने शाहरुख खानसोबत ‘रा.वन’ मध्ये काम केले आहे, तर तिने करिश्मा कपूरसोबत ‘दिल तो पागल’ मध्ये काम केले आहे.
सलमान खान
दोन्ही बहिणींची जोडी सलमान खानसोबतही दिसली. सलमान खान आणि करिश्माचे तसे बरेच चित्रपट आहे दुल्हन हम ले जायेंगे. बिवी नंबर वन, अशा अनेक चित्रपटांमध्ये ही जोडी दिसली आहे. तर सलमान खानने करीना कपूरसोबत बजरंगी भाईजान आणि बॉडीगार्ड सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे.
आमिर खान
आमिर खानने देखील करीना-करिश्मासोबत ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. करीनाने आमिर 3 इडिअट्स, लालसिंग चड्डा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर करीश्मासोबत आमिर खानने ‘राजा हिंदुस्तानी’ मध्ये काम केलं आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. या चित्रपटासाठी करीश्माने एक इंटिमेट सीनही दिला होता. आमिर आणि करिश्माचा हा सीन 3 पूर्ण व्हायला तीन दिवस लागले होते.