तैमूरला सांभाळणाऱ्या आयाचा पगार अधिकाऱ्यापेक्षाही जास्त

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा गोंडस मुलगा तैमूरची लोकप्रियता सर्वांनाच माहित आहे. तैमूरचे क्यूट फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. त्याच्याविषयीच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा असते. नुकतंच करिना कपूरने तैमूरला सांभाळणाऱ्या आयाच्या पगाराविषयी माहिती दिली. एका टॉक शोमध्ये ती बोलत होती. अरबाज खानचा शो Pinch By Arbaaz khan …

तैमूरला सांभाळणाऱ्या आयाचा पगार अधिकाऱ्यापेक्षाही जास्त

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा गोंडस मुलगा तैमूरची लोकप्रियता सर्वांनाच माहित आहे. तैमूरचे क्यूट फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. त्याच्याविषयीच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा असते. नुकतंच करिना कपूरने तैमूरला सांभाळणाऱ्या आयाच्या पगाराविषयी माहिती दिली. एका टॉक शोमध्ये ती बोलत होती.

अरबाज खानचा शो Pinch By Arbaaz khan मध्ये करिनाने अनेक गोष्टींवर दिलखुलास उत्तरं दिली. तैमूरचा सांभाळ करणाऱ्या आयाला अधिकाऱ्यापेक्षाही जास्त पगार दिला जातो असं ऐकलंय असं अरबाज म्हणाला. यावर करिना म्हणाली, “अच्छा… खरंच? त्यांना कसं माहित? पण अधिकाऱ्यांच्या बाबतीत तर मंत्रालयाने विचार करायला हवा”. मुलांची खुशी आणि सुरक्षेसमोर पैशाला महत्त्व नसतं, असंही ती म्हणाली.

आयाला तुम्ही फक्त एक हजार रुपये दिले तरीही काय फरक पडतो, फरक एवढाच पडतो की तुमचा मुलगा सुरक्षित हातात असावा. करिना कपूर सध्या तिच्या आगामी गुड न्यूज या सिनेमाच्या कामात व्यस्त आहे. अरबाज खानच्या शोमध्ये तिने सोशल मीडियावर तिच्याविषयी केल्या जाणाऱ्या कमेंटला उत्तरं दिली. करिना कपूरला बी टाऊनमध्ये पर्सनल आणि प्रोफेशनल लाईपमध्ये बॅलन्स करणारी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. दोन्ही गोष्टी ती अत्यंत उत्कृष्टपणे हाताळत असते.

पाहा करिना काय म्हणाली?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *