आण्टी म्हणणाऱ्याला करिनाचं उत्तर…

आण्टी म्हणणाऱ्याला करिनाचं उत्तर...


मुंबई : अभिनेत्री करिना कपूर खान ही अधिकृतपणे सोशल मीडियावर नसली तरी तिचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर फिरत असतात. या आधुनिक जगात जिथे प्रत्येकजण सोशल मीडियावर आहे. तिथे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली करिना कपूर खान ही कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही. तरीही बेबो या ना त्या कारणाने ट्रोल होत असते. कधी तिचा कुठला फोटो व्हायरल होतो तर कधी तिला ट्रोल केलं जातं. तसं ट्रोलिंग आणि सोशल मीडियावरुन होणारे वाईट कमेंट्स हे या कलाकारांसाठी काही नवीन नाही. अशाच एका कमेंटवर करिनाने नेटकऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे.

करिना कपूर ही अभिनेता अरबाज खान याच्या आगामी वेबसिरीज ‘पिंच’मध्ये आली होती. तेव्हा तिने तिच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून कमेंट करण्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. या कार्यक्रमात तिने तिच्यावर करण्यात आलेले अनेक कमेंट वाचले. यापैकी एका कमेंटमध्ये करिनाला आण्टी म्हणून संबोधण्यात आले, तसेच तिने तिच्या वयानुसार कपडे घालायला हवे, असा सल्लाही देण्यात आला.

हे सर्व कमेंट वाचल्यानंतर करिनाने यावर तिचं मत मांडलं. “अनेकदा आम्हा कलाकरांना लोकांच्या वाईट वागणुकीला सामोरे जावं लागतं. काही लोक तर कलाकारांना भावना नाहीत असंच समजतात. जणूकाही एक कलाकार म्हणून आम्हाला काही भावनाच नाहीत. तरी आम्हाला हे सर्व सहन करावं लागतं”, असं करिना म्हणाली.

करिनाने ट्रोलर्सला सुनावल्याचा हा काही पहिला प्रसंग नाही. तर 2016 सालीही एका मुलाखतीत करिना म्हणाली होती की, आता लोक कलाकारांचा आदर करत नाहीत. “पूर्वी लोक कलाकारांचा आदर करायचे, पण आता जेव्हा मी बघते लोक कलाकारांना तो आदरच देत नाहीत. पूर्वी कलाकारांची एक झलक बघण्यासाठी लोक अक्षरश: वेडे व्हायचे, पण आता सोशल मीडियामुळे ती उत्सुकता राहिलेली नाही. त्यातच काही कलाकार आपले विचित्र फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात”, असे म्हणत करिनाने खंत व्यक्त केली होती.

पाहा व्हिडीओ : 

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI