कार्तिकच्या नव्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली

मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘पती पत्नी और वो’ हा सिनेमा वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे. या सिनेमामध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेही कार्तिकसोबत दिसणार आहे. 1978 साली बी. आर. चोप्रा यांच्या ‘पती पत्नी और वो’ हा सिनेमा आला होता. कार्तिक आर्यनचा हा नवा सिनेमा बी. आर. चोप्रा यांच्या सिनेमाचा …

कार्तिकच्या नव्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली

मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘पती पत्नी और वो’ हा सिनेमा वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे. या सिनेमामध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेही कार्तिकसोबत दिसणार आहे. 1978 साली बी. आर. चोप्रा यांच्या ‘पती पत्नी और वो’ हा सिनेमा आला होता. कार्तिक आर्यनचा हा नवा सिनेमा बी. आर. चोप्रा यांच्या सिनेमाचा रिमेक आहे. कार्तिक आर्यनने ट्विटरवर याबाबतची माहिती दिली आहे. हा सिनेमा वर्षाच्या अखेरीस 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.


या सिनेमात चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेही दिसणार आहे. अनन्या याचवर्षी ‘स्टुडंट ऑफ द इअर’च्या सिक्वेलमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘पती पत्नी और वो’ हा तिचा दुसरा सिनेमा असेल. बी. आर. चोप्रा यांच्या सिनेमात अभिनेता संजीव कपूर, अभिनेत्री विद्या सिन्हा आणि रंजीता कौर हे मुख्य भूमिकेत होते. या सिनेमात विवाहबाह्य संबंधांना विनोदीप्रकारे दाखवण्यात आलं होतं.

‘पती पत्नी और वो’ या सिनेमाचं दिग्दर्शन मुदस्सर अजीजने केलं आहे. 6 डिसेंबरला अभिनेता अर्जुन कपूरचा ‘पानीपत’ हा सिनेमाही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘पती पत्नी और वो’ आणि ‘पानीपत’ हे बॉक्सऑफिसवर आमनेसामने असतील.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *