KBC 11 : बिग बींनी विचारला PUBG चा फुल फॉर्म, स्पर्धकाचे उत्तर....

‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) या शोच्या 11 व्या पर्वाला (Kaun Banega Crorepati Season 11)  नुकतीच सुरुवात झाली आहे. यातील एका स्पर्धकाला केबीसीचे होस्ट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी PUBG या प्रसिद्ध गेमचा फुल फॉर्म काय असा एक विनोदी प्रश्न विचारला.

KBC 11 : बिग बींनी विचारला PUBG चा फुल फॉर्म, स्पर्धकाचे उत्तर....

मुंबई : अनेकांचे करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम म्हणजेच ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC). या शोच्या 11 व्या पर्वाला (Kaun Banega Crorepati Season 11)  नुकतीच सुरुवात झाली आहे. यात सहभागी झालेल्या एका स्पर्धकाला केबीसीचे होस्ट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी PUBG या प्रसिद्ध गेमचा फुल फॉर्म काय असा एक प्रश्न विचारला. मात्र या प्रश्नाचे उत्तर देताना त्या स्पर्धकाने चक्क लाईफलाईनचा वापर करावा लागला.

सोनी टेलिव्हीजन वाहिनीवर ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या 11 व्या पर्वातील दुसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला. यात सहभागी झालेल्या विवेक भगत यांना अमिताभ बच्चन यांनी PUBG या प्रसिद्ध गेमचा फुल फॉर्म काय असा प्रश्न विचारला. अमिताभ यांनी विवेकला हा प्रश्न विचारल्यानंतर ते गोंधळात पडले. त्यांच्यासमोर ठेवलेलं पर्यायही गोंधळात टाकणार असल्याने त्यांनी लाईफलाईनचा वापर करण्याचा निर्णय घेतला.

या प्रश्नाच्या उत्तरासाठी त्यांनी ऑडियन्स पोल या लाईफलाईनचा वापर केला. त्यानंतर 92 टक्के जनतेने त्यांना Player Unknown’s Battlegrounds हे उत्तर असल्याचे सांगितले. त्यानंतर विवेक यांनीही ऑडियन्स पोलसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचं उत्तर बरोबर ठरले.

विवेक हे पंजाबमधील जालंधर येथे राहतात. कर्नाटकातील बंगळूरुमध्ये ते एक GST निरीक्षक म्हणून नोकरी करतात. एक स्पर्धक म्हणून विवेक यांनी चांगला खेळ खेळला. मात्र यातील दोन प्रश्नांना उत्तर देण्यास त्यांना उशीर झाला. विवेकने या शो मधून जास्त पैसे मिळाले नाहीत. त्यांनी एक चुकीचे उत्तर दिल्यामुळे ते थेट 10 हजारांवर आले. त्यामुळे त्यांनी फक्त 10 हजार रुपये जिंकले.

दरम्यान 11 व्या पर्वात 10 हजार रुपये जिंकणाऱ्यांमध्ये विवेक हे दुसरे स्पर्धक ठरले आहेत. आतापर्यंत स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी 10 हजारांपेक्षा जास्त पैसे जिंकलेले नाहीत. त्यामुळे अद्याप तरी केबीसीच्या 11 व्या स्पर्धेत करोडोपती होणारा कोणीही स्पर्धक सहभागी झालेला नाही.

संबंधित बातम्या :

KBC 11 : केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी ‘या’ प्रश्नाचं उत्तर द्या

‘कौन बनेगा करोडपती’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *