Birthday Celebration : वाढदिवसानिमित्त कृती खरबंदाचं 30 मुलींना खास गिफ्ट, शिक्षणाचा खर्च उचलला

बॉलिवूड अभिनेत्री कृती खरबंदा हिने गुरुवारी तिचा 30 वा वाढदिवस साजरा केला. आपल्या वाढदिवसानिमित्त कृतीने 30 मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे.

Birthday Celebration : वाढदिवसानिमित्त कृती खरबंदाचं 30 मुलींना खास गिफ्ट, शिक्षणाचा खर्च उचलला

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कृती खरबंदा हिने गुरुवारी तिचा 30 वा वाढदिवस साजरा केला. आपल्या वाढदिवसानिमित्त कृतीने 30 मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. मुलींच्या शिक्षणासाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने कृतीने 30 गरीब मुलींच्या शिक्षणाची जबादारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे.

कृती यावेळी म्हणाली की, सध्या आपण वैश्विक आरोग्य आपत्तीचा सामना करत आहोत. मागील काही महिने आपल्या सर्वांसाठी खूप तापदायक होते. मला असे वाटते की, त्या गरजू लोकांमध्ये आनंद पसरविण्यासाठीचा माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे. दुर्दैवाने सध्याच्या साथीच्या आजारामुळे मी त्या मुलींना भेटू शकले नाही, परंतु लवकरच मी व्हर्च्युअल मार्गाने त्यांना भेटणार आहे.

कृतीने यंदा आपला वाढदिवस तिचा बॉयफ्रेंड पुलकित सम्राटसोबत साजरा केला आहे. पुलकितने कृतीच्या वाढदिवशी एक खास पोस्टदेखील शेअर केली आहे.

कृतीच्या वाढदिवसानिमित्त तिची प्रमुख भूमिका असलेला आणि बीजॉय नांबियार दिग्दर्शित चित्रपट तैश ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात पुलकित सम्राट, जिम सर्भ, हर्षवर्धन राणे आणि संजीदा शेख यांच्याही भूमिका आहेत.

 

View this post on Instagram

 

#hello #throwback

A post shared by Kriti Kharbanda (@kriti.kharbanda) on

संबंधित बातम्या

Jaan Kumar Sanu Controversy | माझ्या मुलाने मराठी भाषेचा अपमान केलेला नाही, त्याला समजून घ्या, जानच्या आईची विनंती!

Laxmii | खिलाडी कुमारला ‘बॉयकॉट’चा धसका, अखेर ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव बदलले!

Shahrukh Khan | शाहरुख खानच्या आगामी ‘लव्ह हॉस्टेल’मध्ये सान्या मल्होत्रा, विक्रांत मेस्सी झळकणार!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *