साताऱ्यातील वीरपत्नींना शितलीचा सलाम

सातारा: झी मराठीवरील लागिर झालं जी ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. भारतीय सैन्य दलात असलेला अजिंक्य आणि शीतल यांची प्रेमकहाणी, अजिंक्यचं देशप्रेम, कुटुंब अशी सर्व कहाणी या मालिकेत दाखवण्यात आली आहे. लेखक तेजपाल वाघ यांनी आज्या-शितलीची प्रेमकहाणी आणि आज्याचं देशप्रेम एका धाग्यात गुंफलं आहे. आता येत्या 26 जानेवारीला अर्थात प्रजासत्ताक दिनी या मालिकेत देशप्रेमाचा नवा …

साताऱ्यातील वीरपत्नींना शितलीचा सलाम

सातारा: झी मराठीवरील लागिर झालं जी ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. भारतीय सैन्य दलात असलेला अजिंक्य आणि शीतल यांची प्रेमकहाणी, अजिंक्यचं देशप्रेम, कुटुंब अशी सर्व कहाणी या मालिकेत दाखवण्यात आली आहे. लेखक तेजपाल वाघ यांनी आज्या-शितलीची प्रेमकहाणी आणि आज्याचं देशप्रेम एका धाग्यात गुंफलं आहे. आता येत्या 26 जानेवारीला अर्थात प्रजासत्ताक दिनी या मालिकेत देशप्रेमाचा नवा आयाम दाखवण्यात येणार आहे.

मालिकेचं कथानक साताऱ्यातील आहे. नुकतंच ‘लागिर झालं जी’ च्या सेटवर 26 जानेवारीचं चित्रीकरण पूर्ण झालं. यावेळी सातारा जिल्हयातील 10 शहीद जवानांच्या कुटुंबाचा सन्मान करण्यात आला. या मालिकेत प्रथमच सातारा जिल्हयातील शहीद जवानांच्या वीरपत्नींचा सन्मान सोहळा 26 जानेवारी विशेषच्या भागात पाहायला मिळणार आहे. यावेळी आलेल्या प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी या मालिकेचं तोंडभरुन कौतुक केलं. मालिकेतील आज्या आणि शितलीची जोडी पाहून आमचे जुने दिवस आठवल्याची भावना शहीद जवानांच्या वीरपत्नींनी व्यक्त केली. यावेळी या कार्यक्रमातील शितली अर्थात शिवानी बावकरने वीरपत्नींशी बातचीत केली.

लागिर झालं जी या मालिकेच्या 26 जानेवारी विशेष चित्रीकरणादरम्यान, मेजर प्रतापराव भोसले यांनी ‘लागिर’च्या सेटवर येऊन मालिकेचं कौतुक केलं. “या मालिकेमुळे घराघरामध्ये सैन्यदलाविषयी आपुलकी वाढत असून, मिलिट्रीमध्ये भरती होण्यासाठी युवा पिढी पुढे येत आहे” अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *