सलमानसोबत ब्राझीलची मॉडेल सिनेमात झळकणार

अभिनेता सलमान खान हा आपल्या प्रत्येक नवीन चित्रपटात नवनवीन चेहऱ्यांना संधी देत (Salman khan with larissa bonesi) असतो.

Salman khan with larissa bonesi, सलमानसोबत ब्राझीलची मॉडेल सिनेमात झळकणार

मुंबई : अभिनेता सलमान खान हा आपल्या प्रत्येक नवीन चित्रपटात नवनवीन चेहऱ्यांना संधी देत (Salman khan with larissa bonesi) असतो. सलमान सध्या एका प्रोजेक्टवर काम करत आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री लेरीसा बॉजीही काम करताना दिसणार असल्याची माहिती मिळत आहे. लेरीसाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सलमान सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने सलमानच्या कामचे कौतुक (Salman khan with larissa bonesi) केले आहे.

लेरीसा बॉजी एक ब्राझिलियन मॉडेल आणि नर्तक सुद्धा आहे. लेरिसाने याआधी ‘सुभा होने ना दे’ या गाण्यातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. यावेळी तिने अभिनेता अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमसोबत काम केले होते. या गाण्यामध्ये तिच्या हॉट लुकची जोरदार चर्चा झाली होती.

याशिवाय लेरीसाने अभिनेता टायगर श्रॉफ आणि सूरज पांचोलीसोबत म्युझिक व्हिडीओमध्ये सुद्धा काम केले आहे. हे दोन्ही म्युझिक व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की, लेरीसा एक सुंदर आणि मोहक नर्तिका आहे.

लेरीसाचे व्यक्तीमत्व आणि सुंदरतेमुळे तिने टॉलिवूडमध्ये सुद्धा लोकांचे मन जिंकले आहे. लेरीसाने ‘नेक्स्ट एण्ट्री’ आणि ‘ठीक्क’मध्ये काम केले आहे. ‘ठीक्क’ला हिंदीमध्ये डब केले असून त्याला ‘रॉकेट राजा’ नाव दिले आहे. लेरीसाने बॉलिवूडमध्ये अभिनेता सैफ अली खानसोबत ‘गो गोआ गॉन’ या चित्रपटात काम केले आहे.

लेरीसाचा लवकरच पंजाबी सुपरस्टार ‘गुरु रंधावा’ आणि देशी एनआरआय ‘जे शॉन’सोबत ‘सुरमा सुरमा’ या म्युझिक व्हिडीओमध्ये सुद्धा ती आपली अदाकारी दाखवणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *