Malaika Arora | मलायकाचा ‘तो’ फोटो सोशल मीडियावर ट्रोल!

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी मलायका चर्चेत येण्याचे कारण वेगळे आहे.

Malaika Arora | मलायकाचा 'तो' फोटो सोशल मीडियावर ट्रोल!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी मलायका चर्चेत येण्याचे कारण वेगळे आहे. मलायका तिच्या फिटनेसबद्दल खूप जागृत आहे. तिचे जिमच्या बाहेरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र, यावेळी मलायकाची चर्चा जरा वेगळ्याच कारणावरून होत आहे. मलायकाने गुलाबी टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाची जिम वेयर घातली होती. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरून आता मलायकाला ट्रोल केलं जात आहे.(Malaika Arora’s photo trolled on social media)

जिमसमोर असलेल्या या व्हिडीओ-फोटोंमध्ये मलायका अरोराच्या पोटावर स्‍ट्रेच मार्क्‍स दिसत आहेत. यामुळेच तिला ट्रोल केले जात आहे. काहीजण मलायकाला वयस्कर महिला म्हणत आहे तर काहीजण आता तु म्हातारी झाल्याचे म्हणत आहेत. काही लोकांनी तर मलायकाच्या या फोटोंवर अश्लील कमेंट देखील केल्या आहेत. मात्र, यावेळी मलायकासाठी तिचे चाहते धावून आले आहेत.

आपल्या फिटनेसची काळजी घेतानाच फिटनेसचे रहस्य वेळोवेळी चाहत्यांना शेअर करणाऱ्या मलायकाने काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली आहे. कोरोनानंतर केस गळतीची समस्या निर्माण होताच त्यावर देखील तिने मात केली. एवढेच नाही तर तिने ही केस गळती कशी थांबवावी याच्या टिप्स देणारा व्हिडिओ तयार करून चाहत्यांसाठी शेअरही केला होता. मलायकाने #malaikastrickortip च्या खाली व्हिडिओमध्ये आपले केस गळणे थांबवण्यासाठी कोणती रेसिपी वापरली आहे, याची माहिती दिली होती.

केस गळती रोखण्यासाठी ही पद्धत अत्यंत सोपी असल्याचं तिचं म्हणणं होत. कांद्याचा रस बनवून तुम्ही केसांना लावला तर केस गळण्याची समस्या दूर होऊ शकते, असं सांगत स्वत: कांद्याचा रस केसांना लावताना ती दिसत होती. एक कांदा घेऊन त्याचा रस बनविल्यानंतर त्यात कापूस बुडवून हा रस केसांना हळूवारपणे लावताना ती दिसत होती. ज्या व्यक्तींना कोरोना होतो. त्यांना केसांची समस्या जाणवते. प्रत्येक जण आपल्या पध्दतीने केस गळती थांबवण्याठी प्रयत्न करत असतो. मलायकानेही या समस्येवर मात करण्यासाठी अस्सल देशी पद्धतीचा वापर केला होता.

संबंधित बातम्या : 

MeToo | प्रिती झिंटाच्या 2 वर्षांपूर्वीच्या विधानाची सोना महापात्राकडून जोरदार खिल्ली!

Radhe vs SMJ 2 | सलमान विरुद्ध जॉन अब्राहम ‘सामना, कोण मारणार बाजी?

(Malaika Arora’s photo trolled on social media)

Published On - 12:30 pm, Thu, 28 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI