Malvi Malhotra Attack | कंगनाने माझ्याविरुद्धच्या अन्यायात साथ द्यावी, हल्ल्यात जखमी अभिनेत्री माल्वीचं आवाहन

अभिनेत्री माल्वी मल्होत्रावर हल्लाप्रकरणातील आरोपी अखेर पोलिसांना सापडला आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केलेलं नाही.

Malvi Malhotra Attack | कंगनाने माझ्याविरुद्धच्या अन्यायात साथ द्यावी, हल्ल्यात जखमी अभिनेत्री माल्वीचं आवाहन

मुंबई : अभिनेत्री माल्वी मल्होत्रावरील हल्लाप्रकरणातील आरोपी अखेर पोलिसांना सापडला आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केलेलं नाही. आरोपी एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याने त्याला अटक केलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, अभिनेत्री माल्वी मल्होत्रावर मुंबईतील कोकिला बहन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे (Malvi Malhotra appeal Kangana Ranaut to help her in Mumbai Attack case ).

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोपीचं नाव योगेश महिपाल सिंह आहे. तो मुंबईपासून 50 किलोमीटर दूर पालघर जिल्ह्यातील वसई येथे एका रुग्णालयात दाखल आहे.” याबाबत मंगळवारी (27 ऑक्टोबर) रात्री माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी त्याचं ठिकाण शोधलं. अभिनेत्री माल्वीने आपल्या पोलीस तक्रारीत सांगितलं आहे, “योगेशने सोमवारी रात्री मुंबईतील वर्सोवा भागात माझ्या पोटावर आणि दोन्ही हातांवर चाकूने हल्ला केला. योगेश माझ्यासोबत लग्न करु इच्छित होता. मात्र, मी त्याला नकार दिल्याने त्याने माझ्यावर हल्ला केला.”

चाकूने हल्ला केल्यानंतर योगेश घटनास्थळावरुन पळाला. यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता तो सापडला आहे. मात्र, रुग्णालयात दाखल असल्याने सध्या तरी त्याला अटक करता येणार नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. चौकशीसाठी पोलिसांचं एक पथक वसईतील या रुग्णालयात जाणार आहे. आपल्या जबाबात पीडित अभिनेत्री माल्वीने सांगितलं, “आरोपी योगेशला मागील एक वर्षांपासून ओळखते. तो सारखा माझ्याशी लग्न करायचा अट्टाहास करत होता. मात्र, मी त्याला नकार दिला होता. त्यामुळेच त्याने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला.”

कंगनाने माझ्याविरुद्धच्या अन्यायात साथ द्यावी, हल्ल्यात जखमी अभिनेत्री माल्वीचं आवाहन

माल्वीने आपल्या एका व्हिडीओत म्हटलं आहे “ मी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना या प्रकरणात माझी मदत करण्याची विनंती करते. तसेच अभिनेत्री कंगना रनौत यांनीही या लढाईत माझी साथ द्यावी. मी देखील हिमाचल प्रदेशातील आहे. माझ्यासोबत मुंबईत जे झालं, त्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता.”

संबंधित बातम्या :

लग्नास नकार दिल्याचा राग, मुंबईत चित्रपट अभिनेत्रीवर चाकूहल्ला

अभिनेत्री माल्वी मल्होत्रावर जीवघेणा चाकू हल्ला, चेहऱ्यावरही वार करण्याचा प्रयत्न

अभिनेत्री मालवी मल्होत्रावर चाकूहल्ला, हेच फिल्म इंडस्ट्रीचं सत्य; कंगनाची पुन्हा बॉलिवूडवर टीका

Malvi Malhotra appeal Kangana Ranaut to help her in Mumbai Attack case

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *