दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतूपतीवर हल्ला, विमानतळावर एकच हल्लकल्लोळ, Video व्हायरल

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय सेतूपती यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगळूरु विमानतळावर एका अज्ञात व्यक्तीने अभिनेता विजय सेतूपती यांच्यावर हल्ला केला आहे. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतूपतीवर हल्ला, विमानतळावर एकच हल्लकल्लोळ, Video व्हायरल
vijay
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 12:32 PM

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय सेतूपती यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगळूरु विमानतळावर एका अज्ञात व्यक्तीने अभिनेता विजय सेतूपती यांच्यावर हल्ला केला आहे. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेत विजय सेतूपती यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

नक्की काय झालं ? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये, विजय सेतूपती हे विमानतळावरील परिसरात आपल्या टीमसोबत चालत जाताना दिसत आहे. त्यावेळी त्याचवेळी एक अज्ञात व्यक्ती मागून धावत येऊन त्यांच्यावर हल्ला करताना दिसत आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे विजय सेतूपती यांना धक्का बसतो. विजयला पाहिल्यावर असे वाटते की त्याला पलटवार करायचा होता असे वाटले पण विमानतळाच्या सुरक्षेने त्याला तसे करण्यापासून रोखले.मात्र काही वेळाने सर्वकाही ठिक होते. काहीवेळातच विमानतळावरील सुरक्षा कर्मचारी त्याठिकाणी येतात. त्यानंतर ते त्या अज्ञात व्यक्तीला ताब्यात घेतात. व्हिडीओ पत्रकार जर्नादन कौशिक यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बंगळूरु विमानतळावरील पोलिस अधिकाऱ्यांनी या बद्दल माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विजय सेतूपती हे बंगळूरुमधील एका चित्रपटाच्या शूटींगसाठी जात होते. विजय सेतूपतीच्या पर्सनल असिस्टंने त्याच्याकडे येणाऱ्या गर्दीला ढकलले. तेव्हा रागाच्या भरात त्या व्यक्तीने त्याला पाठीमागून त्याच्यावर हल्ला केला. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

आत्ता पर्यंत केलेले काम

विजय यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत ‘एनाबेले सेतूपती’ आणि ‘मास्टर’ हे दोन चांगलेच गाजले. वेबसीरीज करणारे सुध्दा विजयच्या मागे आहेत. फॅमिली मॅन 3 ची तयारी सुरू असतानाच त्यातल्या महत्वाच्या भूमिकेसाठी विजय सेतूपती याचं नाव समोर आलं आहे. अनेकांना माहीत नसेल, पण फॅमिली मॅनच्या (Family Man) दुसऱ्या सीझनसााठी विजयला विचारणा झाली होती. त्यात श्रीलंकन गटनेत्याची भूमिका त्याला देऊ करायची होती. पण काही कारणामुळे ही भूमिका विजयने नाकारली. त्यानंतर मास्टर रिलीज झाला.

इतर बातम्या : 

Lookalike : चाहत्यांना सापडली आलिया भट्टची ड्युप्लिकेट, फोटो पाहून ओळखणं होईल कठीण

Happy Birthday Saumya Tandon | ‘गोरी मेम’ बनून सौम्य टंडनने गाजवला टीव्हीचा पडदा, आरोग्याची कारणं देत सोडली मालिका!

Na Jaa | ‘सूर्यवंशी’चे ‘ना जा’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला, अक्षय कुमार-कतरिना कैफच्या धमाकेदार मुव्ह्सवर प्रेक्षकही धरतील ठेका!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.