‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेत ‘ही’ अभिनेत्री रमाईंच्या भूमिकेत

मुंबई : स्टार प्रवाह या मराठी चॅनलवर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा’ ही नवी मालिका कालपासून (18 मे) सुरु झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बालपणापासूनचा प्रवास या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत बाबासाहेबांच्या पत्नीची म्हणजेच रमाबाईंची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने साकारली आहे. शिवानीने पहिल्यांदा ऐतिहासिक भूमिका साकारली आहे. रमाबाई म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या […]

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेत 'ही' अभिनेत्री रमाईंच्या भूमिकेत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM

मुंबई : स्टार प्रवाह या मराठी चॅनलवर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा’ ही नवी मालिका कालपासून (18 मे) सुरु झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बालपणापासूनचा प्रवास या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत बाबासाहेबांच्या पत्नीची म्हणजेच रमाबाईंची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने साकारली आहे. शिवानीने पहिल्यांदा ऐतिहासिक भूमिका साकारली आहे.

रमाबाई म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. बाबासाहेबांचं उच्च शिक्षण असो, आंदोलनं असो वा सत्याग्रह. रमाबाई त्यांच्यापाठीशी सावलीप्रमाणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी कुटुंबही सांभाळलं. महापुरुषाची सहचारिणी होण्याचं व्रत रमाबाईंनी मोठ्या निष्ठेने आणि प्रेमाने पाळलं. अशा या थोर व्यक्तीची भूमिका साकारायला मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे, असं शिवानीला वाटतं.

माझ्या आयुष्यातली ही खूप वेगळी भूमिका आहे. अतिशय समजूतदार आणि ठेहराव असणारं हे कॅरेक्टर आहे. या भूमिकेसाठीचा पेहराव, भाषा या गोष्टीसुद्धा माझ्यासाठी नवं आव्हान आहे. धनंजय कीर आणि बाबुराव बागुल या लेखकांच्या पुस्तकांचं वाचन मी करतेय. त्याचा मला रमाबाईंची भूमिका साकारण्यासाठी फार उपयोग होतोय. यासोबतच दशमी प्रोडक्शन, स्टार प्रवाह वाहिनी आणि माझे सर्वच सहकलाकार यांच्या पाठिंब्यामुळे ही भूमिका साकारण्यासाठी मला मदत होतेय. रमाबाईंचं कार्य अपार आहे. त्यांचं कार्य या मालिकेतून पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन असे मत शिवानीने व्यक्त केलं.

शिवानीने याआधी आपण ग्लॅमरस रुपात अनेक चित्रपट आणि मालिकेत काम केलं आहे. स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा या मालिकेत शिवानी बाबासाहेबांच्या पत्नीची म्हणजेच रमाबाईंची भूमिका साकारणार आहे. ऐतिहासिक भूमिका साकारण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे आणि त्यासाठी ती प्रचंड उत्सुकही आहे.

संबंधित बातम्या : 

आदर्श शिंदेचा अंगावर काटा आणणारा आवाज, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेचं शीर्षक गीत

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.