‘अहमदनगर महाकरंडक’ स्पर्धेचा पडदा उघडणार! तुम्हालाही सामील व्हायचंय? मग, जाणून घ्या अधिक माहिती…

राज्यातील हौशी कलावंतांच्या नाट्याविष्काराला प्रोत्साहन देणारी, मराठी-हिंदी कलाकारांच्या उपस्थितीत पार पडणारी, भव्यदिव्य पारितोषिके असलेली आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकिका स्पर्धा अहमदनगर महाकरंडक 2022 रंगभूमीची रणभूमी ‘उत्सव रंगभूमीचा, नवरसांचा.’ अहमदनगरमध्ये 12 ते 16 जानेवारी 2022 रोजी होणार आहे.

‘अहमदनगर महाकरंडक’ स्पर्धेचा पडदा उघडणार! तुम्हालाही सामील व्हायचंय? मग, जाणून घ्या अधिक माहिती...
Ahemadnagar Karandak

मुंबई : राज्यातील हौशी कलावंतांच्या नाट्याविष्काराला प्रोत्साहन देणारी, मराठी-हिंदी कलाकारांच्या उपस्थितीत पार पडणारी, भव्यदिव्य पारितोषिके असलेली आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकिका स्पर्धा अहमदनगर महाकरंडक 2022 रंगभूमीची रणभूमी ‘उत्सव रंगभूमीचा, नवरसांचा.’ अहमदनगरमध्ये 12 ते 16 जानेवारी 2022 रोजी होणार आहे.

अनुष्का मोशन पिक्चर्स अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित आणि श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा झी-मराठी च्या सहयोगाने अहमदनगर शहरातील माऊली सभागृहात पार पडणार आहे. राज्यातील हौशी नाट्य संस्था आणि महाविद्यालयांसाठी ही स्पर्धा खुली असेल अशी माहिती अहमदनगर महाकरंडक समितीचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली.

महाराष्ट्राच्या रंगकर्मींसाठी हक्काचे व्यासपीठ!

याबद्दल सांगताना नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, ‘स्पर्धेचे हे नववे वर्षे आहे. मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंतांचे मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले आणि लाभत आहे. अहमदनगर महाकरंडक स्पर्धेमुळॆ महाराष्ट्रभरातील रंगकर्मींना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे नाट्यकलावंतांना या अहमदनगर महाकरंडक स्पर्धेची उत्सुकता असते.’

दिग्गजांचे मार्गदर्शन!

सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेता भरत जाधव, अंकुश चौधरी, केदार शिंदे, सिद्धार्थ जाधव, मंगेश कुलकर्णी, श्रीरंग गोडबोले, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आदीं या स्पर्धेला आत्तापर्यंत पाहुणे म्हणुन लाभले आहेत. तर केदार शिंदे, अमित भंडारी, सुजय डहाके, विजय पाटकर, किरण यज्ञोपवित, प्रवीण तरडे, हेमांगी कवी, सुनील बर्वे, अश्विन पाटील, राजन ताम्हाणे, विकास कदम, मुक्ता बर्वे, विनोद लवेकर हे परिक्षक म्हणून लाभलेले आहेत.

कसा भराल अर्ज?

दि.12 ते 16 जानेवारी 2022 दरम्यान अहमदनगर महाकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार असून 1 डिसेंबर 2021 ते 20 डिसेंबर 2021 पर्यंत www.mahakarandak.com या संकेत स्थळावर प्रवेश अर्ज भरावयाचा आहे.

अहमदनगर महाकरंडकच्या वाढत्या प्रसिद्धीची दखल मराठी वाहिन्यांनीदेखील घेतलेली आहे. झी-ग्रुपच्या झी-मराठी या मराठी वाहिनीचा यावेळी महाकरंडकात सहयोग असणार आहे. त्यामुळे यावेळीची स्पर्धा अधिकच दर्जेदार आणि कसोटी पाहणारी असेल असे अहमदनगर महाकरंडकचे संयोजक स्वप्नील मुनोत यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाच्या सर्व नियमांना अधिन राहून स्पर्धेच आयोजन करण्यात येणार असून ‘आय लव्ह नगर’च्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेला ऑनलाइन स्ट्रिमिंग पार्टनर म्हणून 1 ओटीटी तसेच डिजीटल पार्टनर म्हणून ‘लेटस्-अप’ आणि ‘खासरे टीव्ही’ असल्याचे महावीर प्रतिष्ठानचे हर्षल बोरा यांनी सांगितले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी आणि प्रवेश अर्जासाठी 9607700800 या क्रमांकावर अथवा विवेक जोशी : 7276355148, सौरभ कुलकर्णी : 9028171441 यांच्याशी संपर्क साधावा.

हेही वाचा :

Sai Tamhankar | सई ताम्हणकरला मिळालंय मानाचं स्थान! IMDBच्या ‘टॉप 10’मध्ये अभिनेत्रीचं नाव!

Vijeta | भूमिकेसाठी कायपण! अभिनेत्री प्रीतम कागणेने ‘विजेता’ चित्रपटातील भूमिकेसाठी घटवले वजन!

icky-Katrina Wedding : विकी आणि कॅटरिना बनले पती-पत्नी, घरातच केलं लग्नाचं रजिस्टर मॅरेज!


Published On - 11:24 am, Tue, 7 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI