Dharmaveer: ‘धर्मवीर’ने करून दाखवलं! मराठी चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं

Dharmaveer: 'धर्मवीर'ने करून दाखवलं! मराठी चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं
Dharmaveer hoarding
Image Credit source: Tv9

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक हा आनंद दिघेंच्या भूमिकेत आहे. तर एकनाथ शिंदेंची भूमिका क्षितिज दाते साकारणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 09, 2022 | 9:09 AM

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच नव नवे विक्रम करत आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी लागलेले चित्रपटाचे ३० फुटी कटआऊट्स सर्वांचे लक्ष तर वेधून घेत आहेतच शिवाय चित्रपटाबद्दल अधिक उत्सुकता निर्माण करत आहेत. चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या या तंत्रात आता भर पडली आहे एका लक्षवेधी अशा विक्रमाची. अशी गोष्ट जी आजवर मराठी चित्रपटाच्या (Marathi Movie) प्रसिद्धी किंवा जाहिरात तंत्रात कधीच घडली नव्हती. मुंबईतील वांद्रे (Bandra)येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर आशियातील सर्वात मोठ्या आकाराचे 16800 स्क्वेअर फुटाचे भव्य असे होर्डिंग आहे. या होर्डिंगवर आजवर एकाही मराठी चित्रपटाचे पोस्टर झळकले नव्हते. परंतु आता ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचं भव्य दिव्य पोस्टर झळकले आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओक यांचा हा तेजस्वी आणि करारी बाण्याचा लूक मोठ्या दिमाखात या होर्डिंगवर बघायला मिळत असून या भागातून जाणाऱ्या लाखो वाहनधारकांचे तथा परिसरातील रहिवाश्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या सर्वत्र याच होर्डिंगची चर्चा बघायला मिळत आहे. आभाळाएवढं व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या लोककारणी आनंद दिघे यांचा चरित्रपट असलेल्या या चित्रपटाचे हे होर्डिंग बघताना आभाळासम भासे धर्मवीर हा असाच भाव सर्वांच्या मनात उमटत आहे.

इन्स्टा पोस्ट-

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक हा आनंद दिघेंच्या भूमिकेत आहे. तर एकनाथ शिंदेंची भूमिका क्षितिज दाते साकारणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मकरंद पाध्ये या अभिनेत्याने साकारली आहे. ज्येष्ठ रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांनी या चित्रपटातील हे सर्व लूक डिझाईन केले आहेत. हा चित्रपट येत्या 13 मे रोजी झी स्टुडिओजच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें