Happy Birthday Atul Kulkarni | ‘चांदनी बार’ चित्रपटाने अतुल कुलकर्णीच्या कारकिर्दीला लावले चार चांद, ‘या’ भूमिकांमुळे समीक्षकांकडूनही मिळाली वाहवा!

10 सप्टेंबर 1965 रोजी कर्नाटकात जन्मलेले, अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) हे चित्रपट विश्वातील काही मोजक्या कलाकारांपैकी एक आहेत, ज्यांना एक सशक्त कलाकार म्हणून ओळखले जाते. या वर्षी अतुल आपला 56वा वाढदिवस साजरा करत आहे.

Happy Birthday Atul Kulkarni | ‘चांदनी बार’ चित्रपटाने अतुल कुलकर्णीच्या कारकिर्दीला लावले चार चांद, ‘या’ भूमिकांमुळे समीक्षकांकडूनही मिळाली वाहवा!
अतुल कुलकर्णी
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 7:44 AM

मुंबई : 10 सप्टेंबर 1965 रोजी कर्नाटकात जन्मलेले, अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) हे चित्रपट विश्वातील काही मोजक्या कलाकारांपैकी एक आहेत, ज्यांना एक सशक्त कलाकार म्हणून ओळखले जाते. या वर्षी अतुल आपला 56वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण कर्नाटकातून केले. अतुल कुलकर्णीने दहावीत असताना प्रथम त्यांच्या शाळेत अभिनय केला. यानंतर ते शाळेपासून कॉलेजपर्यंत अनेक नाट्यगटांमध्ये सामील झाले, जिथे त्यांनी अभिनयाचे बारकावे शिकले. यानंतरच अतुल कुलकर्णीने कलाकार होण्याचा निर्णय घेतला.

अतुल कुलकर्णी यांनी मराठी, हिंदी, कन्नड, मल्याळम, तामिळ आणि तेलुगु चित्रपटांमध्येही काम केले आहे. अतुल कुलकर्णी यांनी 1995 मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून डिप्लोमा केला. त्यानंतर ते चित्रपटांकडे वळले. अतुल कुलकर्णीचा बॉलिवूड डेब्यू चित्रपट ‘भूमि गीता’ होता. यानंतर, अतुल कुलकर्णी अशा अप्रतिम पात्रात दिसले, ज्यांनी प्रत्येक प्रेक्षकाला भुरळ घातली.

‘चांदनी बार’मधील अभिनयाचे झाले कौतुक

अतुल कुलकर्णीला मधुर भांडारकरच्या ‘चांदनी बार’मधून प्रचंड यश मिळाले. या चित्रपटातील अतुलचे पात्र खूप प्रसिद्ध झाले. तब्बू या चित्रपटातील मुख्य नायिका होती आणि चित्रपटाची कथाही तिच्याभोवती फिरते, पण तरीही अतुल आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाले.

चांदनी बार व्यतिरिक्त, ते ‘रंग दे बसंती’ आणि ‘द अटॅक्स ऑफ 26/11’ मध्ये दिसला. या चित्रपटांमध्ये, अतुलने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत, तर ते त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने समीक्षकांचे आवडते बनले. यानंतर ते ‘नटरंग’ या चित्रपटात दिसले, जो त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. कुटुंब, मित्र आणि समाजाशी संबंधित सर्व समस्या पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाची कथा या चित्रपटाने सांगितली आहे. लिंगभेदासारखे मुद्देही या चित्रपटात ठळकपणे मांडण्यात आले आहेत.

याशिवाय, त्यांनी पुन्हा एकदा कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात तात्या टोपेचे पात्र साकारून आपली अभिनय प्रतिभा सिद्ध केली. सहाय्यक पात्राबरोबरच अतुल नकारात्मक पात्रातही खूप चर्चित आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की, “माझा दृष्टीकोन एका पात्राऐवजी संपूर्ण कथेवर राहतो. निर्माता किंवा दिग्दर्शक मला सांगत असलेली कथा प्रेक्षकांना आवडेल की, नाही हे मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मी कथा प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून ऐकतो आणि त्यानुसार निर्णय घेतो.”

डिजिटल विश्वात पदार्पण

सद्य काळाची मागणी पाहून अतुल कुलकर्णी वेब सीरीजचाही एक भाग बनले आहेत. ALTBalaji च्या वेब सीरीज ‘द टेस्ट केस’ मध्ये कर्नल अजिंक्य साठे यांच्या व्यक्तिरेखेने त्यांनी डिजिटल जगात प्रवेश केला. याशिवाय ते प्राईम व्हिडीओच्या ‘बंदिश डाकू’ या मालिकेतही दिसले होते. अतुल कुलकर्णीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर त्यांची पत्नी रंगभूमी कलाकार गीतांजली कुलकर्णी आहे. अभिनयाव्यतिरिक्त, ते लहान मुलांसाठी एक स्वयंसेवी संस्था देखील चालवतात.

हेही वाचा :

Baap Beep Baap : वडील आणि मुलामध्ये मैत्रीचे बंध निर्माण करणारं नवं गाणं, ‘बाप बीप बाप’मधील ‘वय नाही’ प्रेक्षकांच्या भेटीला

Bigg Boss Marathi 3 | दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, ‘बिग बॉस मराठी 3’च्या प्रोमोचा मेकिंग व्हिडीओ पाहिलात का?

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.