ही मराठी अभिनेत्री रात्रीच्या वेळी रिक्षा चालवते, बोमन इराणींकडून व्हिडीओ शेअर

मुंबई : अभिनेते बोमन इराणी यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय, ज्यात ते रिक्षाची राईड करत आहेत. लक्ष्मी नावाची मराठी अभिनेत्री अभिनयासोबतच रात्रीच्या वेळी रिक्षाही चालवते. बोमन इराणी यांनी या अभिनेत्रीला रिअल लाईफ हिरोची उपमा देत तिच्यावर गर्व असल्याचं म्हटलंय. बोमन इराणी यांची लक्ष्मीसोबत भेट झाली तेव्हा ती रिक्षा चालवत होती. तिच्याशी गप्पा मारत बोमन …

Marathi TV actress Laxmi, ही मराठी अभिनेत्री रात्रीच्या वेळी रिक्षा चालवते, बोमन इराणींकडून व्हिडीओ शेअर

मुंबई : अभिनेते बोमन इराणी यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय, ज्यात ते रिक्षाची राईड करत आहेत. लक्ष्मी नावाची मराठी अभिनेत्री अभिनयासोबतच रात्रीच्या वेळी रिक्षाही चालवते. बोमन इराणी यांनी या अभिनेत्रीला रिअल लाईफ हिरोची उपमा देत तिच्यावर गर्व असल्याचं म्हटलंय.

बोमन इराणी यांची लक्ष्मीसोबत भेट झाली तेव्हा ती रिक्षा चालवत होती. तिच्याशी गप्पा मारत बोमन इराणी यांनी रिक्षातून प्रवास केला. यानंतर त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केलाय, ज्यात ते तिच्याशी गप्पा मारत आहेत. लक्ष्मीची कहाणी प्रेरणादायक असल्याचं त्यांनी म्हटलंय. मराठी मालिकांमध्ये काम करण्यासोबतच ती रात्री रिक्षाही चालवते, असं ते म्हणाले.

या अद्भुत सुपर लेडी लक्ष्मीला भेटा, ही मराठी मालिकांमध्ये अभिनय करती आणि यासोबतच रिक्षाही चालवते. खरोखर प्रेरणादायी आहे. ती एक रिअल लाईफ हिरो आहे. अपेक्षा आहे तुम्हालाही तिच्या रिक्षातून प्रवास करायला मिळेल. हा खरोखर ऊर्जेचा स्रोत आहे. तुझ्यावर गर्व आहे लक्ष्मी, तुला खुप खुप शुभेच्छा, असं बोमन इराणींनी म्हटलंय.

पाहा व्हिडीओ

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *