Lockdown : नाटकवाल्यांकडून नाटकवाल्यांसाठी सजवलेली जत्रा

जगभरासह देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला (Natya Jatra Program for Theater Workers) आहे.

Lockdown : नाटकवाल्यांकडून नाटकवाल्यांसाठी सजवलेली जत्रा

मुंबई : जगभरासह देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला (Natya Jatra Program for Theater Workers) आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान जीवनावश्यक वस्तूंशिवाय इतर सर्व काही बंद आहे. तसेच चित्रपटाचे शूटिंग, नाटकांचे प्रयोगही बंद करण्यात आले आहेत. काम मिळत नसल्याने रंगमंचावरील कामगारांचेही हाल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर रंगमंच कामगारांना मदत करण्यासाठी परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयातील (एमडी) नाट्यांगणाच्या ग्रुपने ऑनलाईन नाट्य जत्रा एकांकिका आयोजित केली आहे. या नाट्य जत्रेतून रंगमच कामगारांसाठी निधी गोळा करुन आर्थिक सहाय्य केले जाणार (Natya Jatra Program for Theater Workers) आहे.

नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला सेटच्या लेवलपासून ते लाइट्स, म्युझिक अशा गरजेच्या गोष्टीसाठी रंगमंच कामगारांचा महत्त्वाचा सहभाग असतो. हे कामगार नसून रंगमंचं कुटुंबातील एक भाग आहेत. अचानक लॉकडाउन सुरू झाल्याने या कामगारांवरही लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. यावेळी नाट्यांगणातील सगळ्या छोट्या-मोठ्यां कलाकारांनी ठराविक रक्कम गोळा करून “गूगल पे” मार्फत कामगारांपर्यंत मदत पोहोचवली.

जमा करुन दिलेली रक्कम सुद्धा आणखी किती दिवस पुरेल याचा विचार करुन नाट्यांगणातील सगळ्याच “सीनिअर्स-जुनीअर्स”ने मिळून एकांकिकेचा इव्हेंट भरवायचे ठरवले. हा इव्हेंट युट्यब पेजवर ऑनलाईन दाखवला जाईल. ज्यामध्ये इतर कॉलेजचे आणि संस्थेचे एकांकिकेवाले सुद्धा सहभागी असतील आणि त्या एकांकिकेमधून जे काही प्रेक्षक पोचपावती म्हणून पैसे देतील ते पैसे आपण एक छोटासा हातभार म्हणून रंगमंच कामगारांनसाठी देऊ. प्रत्येक एकांकिके खाली 9321183815 हा Gpay चा नंबर असेल.

या एकांकिका कार्यक्रमात रुईया स्वायत्त महाविद्यालय :-एकादशावतार, किर्ती महाविद्यालय :- एकुटसमूह , VJTI :- पॉज, म. ल. डहाणूकर :-लौट आओ गौरी , सिडनहँम महाविद्यालय :- निर्वासित, RAW प्रोडक्शन :- डॉल्बी वाजलं की धड धड , नाट्य वाडा (औरंगाबाद ) :-पाझर, सिद्धार्थ महाविद्यालय :- देव हरवला, रंगयात्रा इचलकरंजी :-मोठा पाऊस आला या सर्व महाविद्यालयांनी आपल्या एकांकिका देऊन या मदत कार्यात सहभाग दर्शवला.

या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि प्रसाद कांबळी यांनी ही या मदत कार्याला पाठिंबा दिला आहे. तसेच तेही खूप मदत करत आहेत.

संबंधित बातम्या :

क्वारंटाईनमध्ये घरबसल्या ‘या’ मराठी अभिनेत्रीने बनवला चक्क वर्तमानपत्रापासून ड्रेस!

“एक दार बंद होतं तेव्हा दुसरं उघडतं”, लॉकडाऊनमध्ये अमेय वाघचा नवा प्रयोग

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *