प्रियांका चोप्राच्या बहिणीच्या खाद्यपदार्थात किडे, 5 स्टार हॉटेलवर टीकेची झोड

प्रियांका चोप्राची बहिण मीरा चोप्राने अहमदाबादमधील (Ahmadabad) एका फाईव्ह स्टार हॉटेलवर किडे असलेले खाद्यपदार्थ दिल्याचा आरोप केला आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओत अन्न पदार्थातील हे किडे स्पष्टपणे पाहायला मिळाले.

प्रियांका चोप्राच्या बहिणीच्या खाद्यपदार्थात किडे, 5 स्टार हॉटेलवर टीकेची झोड

अहमदाबाद : बॉलीवुड अभिनेत्री प्रियांका चोप्राची (Priyanka Chopra) बहिण मीरा चोप्राने (Meera Chopra) नुकताच ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने अहमदाबादमधील (Ahmadabad) एका फाईव्ह स्टार हॉटेलवर किडे असलेले खाद्यपदार्थ दिल्याचा आरोप केला आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओत अन्न पदार्थातील हे किडे स्पष्टपणे पाहायला मिळाले.

मीरा चोप्रा मागील आठवड्यात अहमदाबाद येथील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबली होती. यावेळी हॉटेलने त्यांना दिलेल्या खाद्यपदार्थांमध्ये किडे निघाले. यानंतर मीरा चोप्राने याचा व्हिडीओ करत सोशल मीडियावर शेअर केला.


मीरा चोप्रा यात म्हणाली, “मी अहमदाबादमधील हॉटेलमध्ये आहे. या ठिकाणी मी रूम सर्विसकडून खाद्यपदार्थ ऑर्डर केले आणि मला काय मिळाले? मला दिलेल्या खाद्यपदार्थांमध्ये किडे निघाले. आम्ही या हॉटेलमध्ये राहण्यासाठी भरपूर पैसे खर्च केले. मात्र, हे लोक आम्हाला खाद्यपदार्थांमधून किडे खाऊ घालत आहेत.

मी मागील आठवडाभरापासून या हॉटेलमध्ये थांबली आहे. जेव्हापासून मी येथे राहत आहे, तेव्हापासून माझी तब्येत खराब होत आहे. आता मला त्याचे कारण समजले आहे. माझ्या खाद्यपदार्थांमध्ये मला किडे सापडले आहेत, असंही मीरा चोप्राने नमूद केलं.


मीराच्या ट्विटनंतर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने (FSSAI) रीट्विट करत यावर काळजी व्यक्त केली. तसेच या हॉटेलवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी म्हटलं, “आम्ही या तक्रारीची दखल घेत यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कृपया आम्हाला काही वेळ द्या.”
मीराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. युजर्स त्यांचे अनुभव शेअर करतानाच संबंधित हॉटेलवर कारवाईची मागणी करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *