'मॅन वर्सेस वाईल्ड' शूटिंगदरम्यान दुर्घटना, सुपरस्टार रजनीकांत जखमी

दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत हे शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत. ते जगप्रसिद्ध शो 'मॅन वर्सेस वाईल्ड'चं शूटिंग करत होते, यावेळी शूटिंगवेळी रजनीकांत जखमी झाल्याची माहिती आहे.

'मॅन वर्सेस वाईल्ड' शूटिंगदरम्यान दुर्घटना, सुपरस्टार रजनीकांत जखमी

बंगळुरु : दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत हे शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत (Megastar Rajnikant Injured). ते जगप्रसिद्ध शो ‘मॅन वर्सेस वाईल्ड’चं (Man vs Wild) शूटिंग करत होते, यावेळी शूटिंगवेळी रजनीकांत जखमी झाल्याची माहिती आहे. कर्नाटकमधील बांदिपूर येथील जंगलात ‘मॅन वर्सेस वाईल्ड’चं शूटिंग सुरु होतं. यावेळी या कार्यक्रमाचा होस्ट बेअर ग्रील्ससोबत (Bear Grylls) रजनीकांत शूटिंग करत असताना ही दुर्घटना घडली आणि किरकोळ दुखापत झाली.

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता. त्यानंतर आता सुपरस्टार थलाईवा रजनीकांत ‘मॅन वर्सेस वाईल्ड’मध्ये दिसणार आहेत. ब्रिटनचा प्रसिद्ध साहसवीर बेअर ग्रील्ससोबत ते शूटिंग करत होते. तेव्हा त्यांना दुखापत झाली. या कार्यक्रमाचं शूटिंग कर्नाटकच्या प्रसिद्ध बांदिपूर जंगलात सुरु आहे. हे जंगल वाघांसाठी खूप प्रसिद्ध आहे.

या कार्यक्रमासाठी कर्नाटक वन विभागाने चित्रीकरणासाठी परवानगी दिली. त्यानंतर या कार्यक्रमाचं शूटिंग सुरु करण्यात आलं. हे शूटिंग तीन दिवस चालणार आहे. शूटिंगदरम्यान रजनीकांत आणि बेअर ग्रील्स हे बांदिपूर जंगल आणि निसर्गाबाबत चर्चा करणार होते. बेअर ग्रील्स त्यांच्या 18 जणांच्या टीमसोबत शूटिंग करत होते. मात्र, यादरम्यान रजनीकांत यांनी दुखापत झाली.

पंतप्रधान मोदींचाही ‘मॅन वर्सेस वाईल्ड’मध्ये सहभाग

‘मॅन वर्सेस वाईल्ड’ या प्रसिद्ध कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनीही सहभाग घेतला होता. त्या कार्यक्रमाची खूप चर्चाही झाली होती. ‘मॅन वर्सेस वाईल्ड’च्या त्या भागाचा टीआरपीही सर्वात जास्त होता. यावेळी पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच अशाप्रकारच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.हा कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या चाहत्यांच्या पसंतीस पडला होता. या भागाचं शूटिंग उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात झालं होतं. हा भाग गेल्या वर्षी 12 ऑगस्टला प्रदर्शित करण्यात आला होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *